खुशखबर ! इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं मोठं गिफ्ट, आता कोणत्याही बँकेचे ग्राहक काढू शकतात पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुरुवातीच्या एक वर्षातच एक कोटी ग्राहकांशी जोडली गेलेली इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आयपीपीबी बँकेने लवकरच आधार संबंधित सर्व सेवा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कोणत्याही बँकेतले ग्राहक या बँकेतून देखील पैसे काढू शकतात.

पुढील एक वर्षात पाच कोटी ग्राहक –
प्रसारण आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना या सेवांची घोषणा केली. त्याचबरोबर कमी कालावधीत एक कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचल्याबद्दल बँकेला शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले कि, लवकरच आपण या बँकेचे पाच कोटी ग्राहक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील वर्षापर्यंत हे आपल्याला सध्या करायचे आहे. त्याचबरोबर आधारसंबंधित सेवा सुरु केल्यानंतर कोणत्याही बँकेतील ग्राहक याठिकाणी येऊन पैसे काढू शकेल. मात्र त्याचे खाते आधार क्रमांकाला जोडलेले असावे.

वंचित नागरिकांना सेवा देणार आयपीपीबी –
यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी या बँकेचे उद्दिष्ट सांगताना म्हटले कि, वंचित आणि गरीब नागरिकांना सेवा देणे हेच बँकेचे मुख्य आणि महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यांना यामार्फत कर्जदेखील उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे लवकरच आम्ही याचा विस्तार करणार आहोत. आयपीपीबी हि बँकिंग सुविधा मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरु करण्यात आली होती.

आरोग्यविषयक वृत्त –