खुशखबर ! ‘या’ सरकारी बँकेत फ्री ATM सुविधा, जास्तीच्या व्याजासह इतर सुविधा उपलब्ध, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ही भारत सरकारच्या टपाल व संचार मंत्रालयांतर्गत येणारी एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बॅंकेद्वारे देशातील दुर्गम भागातही बँकिंग सुविधा वाढवणे अधिक सोपे झाले आहे. अलीकडेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने पूर्ण ऑपरेशन्सचे एक वर्ष पूर्ण केले होते आणि त्यानंतरच बँकेने आधार पेमेंट सिस्टम (IPPB) आधारित सेवा सुरू केली.

मोफत मिळणार एटीएम आणि अलर्टची सुविधा –
इतर बँकांप्रमाणे इंडिया पोस्ट पेमेंट बँक एटीएम आणि त्याबाबतच्या मेसेजेस साठी कोणताहे शुल्क आकारात नाही. इतर बँका खात्याचे मेसेज अपडेटसाठी पंचवीस ते पन्नास रुपयांपर्यंत शुल्क आकारतात.

ठेवीवर मिळेल एवढे व्याज –
इंडिया पोस्ट पेमेंट बँक 25 हजार रुपयांवर 4.5 % व्याज देते.  25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत 5 % इतके व्याज देते. 50 हजार ते एक लाख रुपयांवर बँक ग्राहकांना 5.5 % या दराने व्याज देते.

या सुविधा मिळतात –
आईपीपीबी मध्ये चालू खाते आणि बचत खाते तसेच ऑनलाईन बिल सुविधांसोबत अनेक नव्या सुविधा देखील यामध्ये दिल्या जातात. यामध्ये ग्राहकांना काउंटर सेवा, माइक्रो एटीएम, मोबाइल बैंकिंग एप, एसएमएस, थर्ड पार्टी इंश्योरेंस आणि आईव्हीआरच्या सुविधा दिल्या जातात.

कोणताही बँकधारक पैसे काढू शकतो –
आईपीपीबीच्या माध्यमातून आता कोणत्याही बँकेचा ग्राहक पैसे काढू शकतो आणि खात्याविषयी माहिती घेऊ शकतो. या सुविधेसाठी बँक ग्राहकांचे खाते आधार कार्डशी जोडले गेलेले असणे गरजेचे आहे. यानंतर ग्राहकांना केवळ आपल्या हातांच्या ठशांनी व्यवहार करता येणार आहेत.

IPPB सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म –
बँकेचे सीईओ सुरेश सेठी यांनी सांगिलते की, ही बँक सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. या बँकेची सुविधा 1,36,000 पोस्ट ऑफिसवर उपलब्ध आहेत आणि सध्या यामध्ये 17 कोटी सक्रिय खातेधारक आहेत.

डिजिटल देवाण घेवाण वाढवण्यावर भर –
आईपीपीबीचे लक्ष्य देशातील डिजिटल देवाण घेवाण वाढवणे हे आहे. 2016 मध्ये नोटबंदी नंतर यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे.  डिजिटल देवाण घेवाण वाढून 296 कोटी आणि मुल्ल्यांच्या हिशोबाने 283 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते उदघाटन –
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमध्ये तालकटोरा स्टेडियममध्ये या योजनेचे उदघाटन करून सुरुवात केली होती. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ही भारत सरकारच्या टपाल व संचार मंत्रालयांतर्गत येणारी एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.

कोण आहेत मालक ?
रवि शंकर प्रसाद यांनी आईपीपीबी व्यतिरिक्त पुढील वर्षी पाच कोटी ग्राहक बनवण्याचा निश्चय केला आहे. आईपीपीबीचे सीईओ आणि एमडी सुरेश सेठी हे आहेत. 23 ऑक्टोबर 2017 ला सरकारद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सेठी याआधी वोडाफोन एम -पैसा मध्ये एमडी होते. सेठी यांनी या आधी एस बँक आणि सिटीग्रुप मध्ये काम केलेलं आहे आणि त्यांना 27 वर्षांचा अनुभव देखील आहे.

Visit : Policenama.com