India Post Recruitment 2021 | पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनसह अनेक जागांसाठी भरती; गुणवंत खेळाडूंसाठी जागा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – India Post Recruitment 2021 | भारतीय पोस्टच्या बिहार सर्कलने ६० जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर असलेल्या नोटिफिकेशननुसार पोस्टल / सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि एमटीएस या पदांसाठी ही भरती होणार आहे. ‘स्पोर्ट्स कोटा’ अंतर्गत गुणवंत ‘खेळाडूं’साठी ही भरती होणार आहे. (India Post Recruitment 2021)

 

पोस्टल असिस्टंटची ३१ पद, सॉर्टिंग असिस्टंटची ११ पद, पोस्टमनची ५ पदं आणि मल्टी टास्किंग स्टाफची १३ पदं रिक्त आहेत. पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी उत्तीर्ण झालेला असावा. आणि त्याला स्थानिक भाषेचं ज्ञान असावं. एमटीएस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १० वी उत्तीर्ण असावा. स्थानिक भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, संबंधित क्रीडा पात्रता देखील असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय ३१ डिसेंबर २०२१ पासून मोजण्यात येईल. दरम्यान, नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सवलत दिली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर दिलेला फॉर्म भरून विहित पत्त्यावर पाठवायचे असून अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.

 

Web Title :-  india post recruitment 2021 apply for postman multi tasking staff and other post indiapost

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा