Chandrakant Patil | ‘चुकीचं विधान करणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार रहावं’, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) कार्यकर्त्यांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्लीच्या मंडावली पोलीस ठाण्यात (Mandawali Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात कलम 500 आणि 509 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांना टोला लगावला आहे. चुकीचं विधान (false statement) करणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार राहावं, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

 

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, एखादं वक्तव्य केलं आणि ते चुकीचे असेल तर होणाऱ्या कारवाईची पण तयारी ठेवली पाहिजे. त्यामुळे त्यांनी वापरेलेला तो शब्द चुकीचा आहे की नाही ते त्यांनी आता पोलिसांना (Police) किंवा न्यायालयात (Court) सांगावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

पेपर फुटीचे पाळेमुळे थेट मंत्रालयात

पेपर फुटी प्रकरणावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराची (corruption) परिसीमा चालली आहे. म्हाडाच्या परीक्षेचा (MHADA exam) पेपर फुटला त्याची पाळेमुळे थेट मंत्रालयात आहेत. हे सरकार सगळ्यांच्या जीवाशी खेळत आहे. एसटी कर्मचारी (ST staff), एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या (MPSC student) जीवनाशी, आरोग्य विभागाची परीक्षा (health department Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी, मराठा आरक्षण (Maratha reservation), ओबीसी आरक्षण (OBC reservation), शेतकऱ्यांची कर्जमाफी, नुकसान भरपाई या सर्वांच्या जीवनाशी हे सरकार खेळत असल्याची टीका पाटील यांनी केली.

 

कोरोना काळात भाजपचा कार्यकर्ता फिल्डवर होता

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, महापौरांसह (Mayor) सर्वांचा कोरोना काळात ठेके मिळवण्यावर भर होता.
कोव्हीड सेंटरमधल्या एका थाळीची किंमत चारशे रुपये होती. कोव्हीडमध्ये सुद्धा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केले.
त्याच काळात भाजपचा कार्यकर्ता फिल्डवर होता. पालघर जिल्ह्यात भाजपचे 37 कार्यकर्ते गेले. त्यामुळे लोकांना दूध का दूध पाणी का पाणी कळते.

 

Web Title :- Chandrakant Patil | those who make false statements should be ready action chandrakant patil said sanjay raut statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा