Coronavirus in India : देशात एका दिवसात 2764 जणांचा मृत्यू तर 3.20 लाख नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा कहर भारतात अजूनही सुरूच आहे. मागील आठवड्यापासून भारतात दररोज 3 लाखांपेक्षा जास्त नवीन प्रकरणे समोर येत आहेत. रविवारी विक्रमी साडेतीन लाखापेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली. तर, सोमवारी कोरोनाच्या नवीन प्रकरणात किंचित घट नोंदली गेली. वर्ल्डोमीटरनुसार, देशात सोमवारी कोरोना व्हायरसची 3 लाख 20 हजार 435 नवी प्रकरणे आढळली आहेत. तर या दरम्यान 2764 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात आता कोरोनाने एकुण मृत्यूंची संख्या 1 लाख 97 हजार 880 वर पोहचली आहे. तर, देशात आता कोरोना व्हायरसची 28 लाख 82 हजार 513 अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे आहेत.

भारतात नवीन प्रकरणांमधील ही घसरण महाराष्ट्रामुळे सुद्धा आली आहे, येथे सोमवारी कोरोनाच्या नवीन प्रकरणात मोठी घसरण झाली. राज्यात जिथे दररोज 60 हजारच्या पुढे नवीन प्रकरणे येत होती, तिथे आता सोमवारी 48 हजार 700 नवी प्रकरणे आली आहेत. रविवारी मृतांचा आकडा 800 च्या पुढे पोहचल्यानंतर मृतांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. तिकडे, मुंबईत सुद्धा काल एका दिवसात केवळ 3,876 नवीन केस समोर आल्या आहेत.

दिल्लीत जारी आहे कोरोनाचे तांडव
महाराष्ट्रातून थोडा दिलासा मिळत असताना आता दिल्लीमध्ये कोरोनाने कहर सुरू केला आहे. राजधानीमध्ये सोमवारी कोरोनामुळे विक्रमी 380 लोकांचा मृत्यू झाला. हा एका दिवसातील मृतांचा सर्वाधिक आकडा आहे. सोमवारी दिल्लीत कोरोनाची 20 हजार 20201 नवी प्रकरणे नोंदली गेली.

बरे होण्याचा दर कमी होऊन 82.6 टक्के झाला
कोरोनातून बरे होणार्‍या लोकांचा दर घसरून 82.6 टक्के राहिला आहे. आकड्यांनुसार, या आजारातून बरे होणार्‍या लोकांची संख्या वाढून 1,42,96,640 झाली आहे तर मृत्यूदर घसरून 1.13 टक्के राहिला आहे.