‘फोर स्टार’ जनरल असणार भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या पद निर्मितीला केंद्रीय सुरक्षा समितीने मंजुरी दिली आहे. या पदावर असणाऱ्या व्यक्तीची सैन्य दलामध्ये समन्वय राखण्याबरोबरच, सीडीएसवर लष्करी सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असेल. परंतु सीडीएसचा कार्यकाळ किती असेल हे अद्यापही निश्चित झाले नाही, असे असले तरी लष्करांच्या विविध मोहिमांमध्ये समन्वय राखण्याबरोबर शस्त्रास्त खरेदीमध्ये सीडीएसची भूमिका महत्वाची असेल.

लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ निवडला जाईल. जितका वेतन सैन्य दल प्रमुखांचे आहे तितकेच वेतन सीडीएसला देण्यात येईल. सीडीएस पदावरील व्यक्ती फोर स्टार जनरल असेल. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लष्कर प्रमुख असलेले बिपीन रावत हे चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदी आहेत. परंतु त्यांच्याकडे सीडीएसचे अधिकार नाहीत.

कारगील युद्धानंतर स्थापन झालेल्या समितीने सर्वप्रथम मागणी केली की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद निर्माण करावे. कारगिल युद्ध घडले त्यावेळी सुरक्षेमध्ये नेमक्या काय त्रुटी राहिल्या, पुढे काय सुधारणा कराव्या लागतील यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती.

मागील स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सीडीएस पदाच्या निर्मितीची घोषणा केली होती. सध्याचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचे नाव सीडीएस पदासाठी आघाडीवर आहे. पंतप्रधान मोदी भाषणात म्हणाले होते की, सैन्य दल आपल्याला अभिमान आहे. या सैन्य दलात योग्य समन्वय राहावा यासाठी लाल किल्ल्यावरुन मला महत्वाची घोषणा करायची आहे. जर देशाला स्वत:चा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असेल तर त्यामुळे सैन्य दले अधिक प्रभावी कार्य करतील.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/