काय सांगता ! होय, टीम इंडियाचा पराभव होताना डेव्हिड वॉर्नर चक्क तेलुगू गाण्यावर डान्स करत होता (व्हिडीओ)

ॲरोन फारच, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांतील असलेल्या कमतरता पहिल्या वनडे सामन्यात दाखवून दिल्या. त्यानंतर जोश हेझलवूड व ॲडम यांनी विराट कोहली अँड टीमला जोरदार धक्के दिले.

374 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला 66 धावा कमी पडल्या आणि ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये सुखावलेल्या टीम इंडियाला पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाचा दणका दिला. भारतीय संघाचा पराभव होत असताना सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारा डेव्हिड वॉर्नर डान्स करताना चा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

लॉकडाऊनच्या काळात वॉर्नर कुटुंबीय TikTok वर फेमस झालं. पण, भारत TikTok वर बंदी आली अन वॉर्नरला भारतीय चाहत्यांना गमवावा लागला. वॉर्नरच्या अनेक TikTok व्हिडिओने क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केलं. दरम्यान, तेलुगु चित्रपटातील प्रसिद्ध गाणं बुट्टी बोम्मवर केलेला डान्स तुफान व्हायरल झाला होता. त्याची झलक पुन्हा एकदा सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाहायला मिळाली. या सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्यांच्या आग्रहास्तव वॉर्नर नाचला.

 

 

 

 

You might also like