IND vs AUS : रोहित शर्माची एक चूक पडली महागात, जाणून घ्या प्रकरण

पोलिसनामा ऑनलाईन – नव्या वर्षाचं सेलिब्रेशन टीम इंडियाच्या (India vs Australia) पाच खेळाडूंना चांगलंच महागात पडलं. रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी अशी या खेळाडूंची नवे आहेत. येथील एका हॉटेलमध्ये जेवायचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले. त्यानंतर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, भारतीय खेळाडूंनी चेडस्टन शॉपिंग सेंटरच्या बारबीक्यू रेस्टॉरंटमध्ये जेवत होते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी टीम इंडियाचे खेळाडू जेवायला आल्याचं सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना मान्य केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे दोन्ही खेळाडूंना आणि कर्मचाऱ्यांना कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. खेळाडूंना बाहेर जाऊन खाण्याची परवानगी असली तरी त्यांना हॉटेलच्या आत नाही तर बाहेर बसावं लागेल, असा नियम करण्यात आला आहे. पण या फोटोंमध्ये टीम इंडियाचे खेळाडू हॉटेलच्या आतमध्ये बसून जेवताना दिसत आहेत.

हॉटेलमध्ये गेल्यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांने त्यांचं संपूर्ण बिल भरलं. भारतीय खेळाडूंनी हॉटेलमध्ये सॉय सॉस चिकन, चिकन मशरूम आणि डाएट कोक प्यायलं, याचं बिल ११८. ६९ ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच ६,६८३ भारतीय रुपये झालं. बीसीसीआय (BCCI) ने भारतीय खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल तोडल्याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नव्या वर्षी टीम इंडियाचे खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवण करताना दिसले. त्यामुळे खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉलचं उल्लंघन करताना दिसले.