Ind vs Eng : टीम इंडियासाठी खुशखबर ; बऱ्याच काळानंतर मैदानावर दिसला ‘हा’ खेळाडू, आता इंगलंडची खैर नाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  इंग्लंड विरुद्ध अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या टेस्ट मॅच खेळण्यासाठी भारतीय टीम तयारी करत आहे. हा सामना ४ मार्चपासून खेळला जाणार आहे. त्यानंतर टीम टी २० सीरिजमध्ये सहभागी होईल. ज्यात पाच मॅच आयोजित केल्या आहेत. त्याचवेळी भारतीय क्रिकेट टीमसाठी एक शुभवार्ता आली आहे. ती अशी आहे की, भारतीय संघाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा त्याच्या अंगठ्याला झालेल्या इजेतून बाहेर येत मैदानावर दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जडेज्याच्या अंगठ्याला इजा झाली होती. त्यामुळे अंगठ्याची सर्जरी करावी लागली. त्यांना आरामाचा सल्ला दिला गेला. पण आता त्यांनी मैदानावर सराव चालू केला आहे आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे.

रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये जखमी झाला. या सिरीजमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या जडेजाला दुखापत झाल्याने ब्रिस्बेन येथे झालेला चौथा आणि निर्णायक सामना तो खेळू शकला नाही. या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आणि ऑस्ट्रेलियातील लागोपाठ दुसरी टेस्ट सिरीज टीमच्या नावावर केली. जडेजाने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करून ‘आता मैदानावर परत आलो आहे’ असे लिहले आहे. जडेजाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. असे म्हणत आहेत की, जडेजा इंग्लंडच्या विरोधात असलेल्या टी २० च्या सामन्यात वापस खेळताना दिसणार आहे.

१२ मार्चपासून सुरु होणार टी २० सिरीज

भारत आणि इंग्लंड टीम सिरीजमध्ये चार मॅचेसमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. सिरीजमध्ये टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. टेस्ट सीरिजनांतर दोन्ही संघामध्ये पाच मॅचचा टी – 20 १२ मार्चपासून सुरु होईल. सर्व सामने अहमदाबादमध्ये नवीन झालेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहेत. त्यानंतर दोन्ही संघ तीन वन डे मॅचेस सिरीजमध्ये मुकाबला करणार आहेत. वन डे सीरिजच्या सर्व मॅचेस पुण्यात खेळल्या जातील. त्यानंतर भारतीय खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या सिरीजमध्ये उतरणार आहेत. रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज या टीममध्ये सहभागी होईल.

२ ओव्हरमध्ये ३३ रन मिळवणारा, टीम इंडियामधून बाहेर काढलेला ओंराउंडर, तात्काळ निवृत्तीची घोषणा केली.