ICC वर्ल्डकप २०१९ : पाकच्या फलंदाजांना काय सल्ला देशील विचारताच रोहितने दिलं ‘हे’ उत्तर

इंग्लंड : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तानमध्ये काल झालेलेल्या सामन्यात पाकिस्तानला प्रथेप्रमाणे भारतासमोर शरणागती पत्करावी लागली. पाकिस्तानच्या पराभवावर भारताच्या चाहत्यांसह पाकिस्तानच्या चाहत्यांनीही पाकिस्तानच्या खेळाडूंवर टीका केली आहे. सर्वत्र पाकिस्तानी खेळाडूंची खिल्ली उडवण्यात येत आहे. या सामन्यात हिटमॅन रोहितचे शतक वाखण्या जोगे होते. तसंच रोहितला एल राहुलने चांगली साथ दिली. भारताने पाकिस्तानला ३३६ धावांचे आव्हान दिले होते. जे त्यांना पेलता आले नाही.

या सामन्यात भारतीय फलंदाजी पाकिस्तानच्या गोलंदांवर भारी पडली. तर पाकिस्तानचे फलंदाजही भारतीय गोलंदाजांसमोर टिकले नाही. त्यामुळे सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितला एक प्रश्न विचारण्यात आला. पाकिस्तानच्या फलंदाजांना काय सल्ला देशील. त्यावर रोहितने हसून उपहासात्मक उत्तर दिले. ”पाकिस्तानचा मी प्रशिक्षक बनेन तेव्हा मी त्यांच्या फलंदाजांना सल्ला देईन, आता नाही.”, असं रोहितने म्हणताच पत्रकारांनी हसून त्याचे कौतुक केले.

दरम्यान, या सामन्यात रोहितनं १४० धावांची खेळी करत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. रोहितने ११३ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने चोपल्या १४० धावा केल्या. त्यासोबत लोकेश राहुलने साथ देत १३६ धावांची भागिदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी आहे. तसंच वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला आता पर्यंत ७ वेळा हरवले आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांचा आनंदही वेगळाच होता.

https://twitter.com/ESPNcricinfo/status/1140478802432102400/video/1

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

पीळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी गाईचे दूध चांगले की म्हशीचे ?