India Vs Pakistan | भारत-पाकिस्तान सिरीज होणार का? सौरव गांगुलीने दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – India vs Pakistan | गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यामध्ये द्विपक्षीय सीरिज खेळवण्यात आली नाही. फक्त आयसीसी स्पर्धा (ICC Trophy) आणि आशिया कप (Asia Cup) या दोन सिरीज वगळता या दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत. भारत-पाकिस्तान यांच्यात 2012-13 साली शेवटची सिरीज खेळवण्यात आली होती. यामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 मॅच खेळवण्यात आल्या होत्या. दोन्ही देशांमधल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम क्रिकेटवर (Cricket) झाला होता. यानंतर आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी दोन्ही देशांमध्ये पुन्हा क्रिकेट सुरू व्हावं, अशी मागणी केली आहे. त्यावर आता बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी एक क्रिकेट बोर्ड कोणत्याही निर्णयापर्यंत येऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

भारत-पाकिस्तान (India Vs Pakistan) फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. दोन देशांमध्ये क्रिकेट खेळण्याबाबत संबंधित सरकारांना काम करावं लागेल.
‘हे क्रिकेट बोर्डांच्या हातात नाही. जागतिक स्पर्धांमध्ये दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध खेळतात.
दोन्ही देशांमधलं क्रिकेट कित्येक वर्षांपासून थांबलं आहे.
यावर दोन्ही देशांच्या सरकारला काम करावं लागेल. हे रमीझ राजांच्या हातात नाही किंवा माझ्या,’ असे सौरव गांगुली म्हणाले आहेत.

याअगोदर भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट  सामने सुरू व्हावेत, यासाठी आपण जय शाह (Jai Shah)आणि सौरव गांगुलीसोबत बोललो असल्याचं रमीझ राजा (Rameez Raja) काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
राजकारणाला खेळापासून लांब ठेवलं पाहिजे, असं मत रमीझ राजा यांनी व्यक्त केले होते.

हे देखील वाचा

Chitra Wagh Letter To Ajit Pawar | राष्ट्रवादीला ‘सोडचिठ्ठी’ देऊन भाजपात गेलेल्या चित्रा वाघ यांचं अजित पवारांना पत्र, म्हणाल्या…

Hardik Pandya Watch | हार्दिक पांड्याकडून 5 कोटींची घड्याळं जप्त, मुंबई कस्टम विभागाकडून कारवाई

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : sourav ganguly reacts on india vs pakistan cricket

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update