भारत-पाक लढती दरम्यान पाऊस पडल्यास १०० कोटी रुपयांचे होणार नुकसान ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामान होणार आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात हा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने क्रीडा रसिक आणि भारतीय पाठीराखे चिंतेत आहेत. त्यामुळे सगळ्यांचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार? हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला असणार. त्यामुळे उद्या हवामान खात्याने देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

दिवसभरात तीनवेळा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. तर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या १०० कोटी कमावण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लागू शकतो. या क्रीडा वाहिनीला इतक्या मोठया प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे. या सामन्यासाठी या वाहिनीने ५० कोटी रुपयांचा विमा काढला आहे. परंतु या सामन्यानंतर हि संपूर्ण रक्कम परत मिळेल कि नाही याची शाश्वती नसल्याचे वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढती महत्त्वाच्या आहेत. या सामन्यांत जाहिरातीचे दर सर्वात जास्त असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रविवारी होणाऱ्या या सामना साठी जाहिरातीचा दर देखील तितकाच तगडा ठेवण्यात आला आहे. या सामन्यात १० सेकंदाच्या जाहिरातीसाठी २५ लाख रुपये मोजावे लागत आहेत. भारताच्या अन्य सामन्यात दहा सेकंदाच्या जाहिरातीसाठी १६ ते १८ लाख मोजावे लागत आहेत,  तर अन्य सामन्यांसाठी केवळ ५ लाख मोजले जात आहेत. त्यामुळे जर हा सामना रद्द झाला तर आयसीसी, बीसीसीआय त्याचप्रमाणे स्टार या क्रीडा वाहिनीचे देखील फार मोठे नुकसान होणार आहे.

सिने जगत –

BigBoss Marathi-2 : मी किशोरी नाही, तिच्या आणि माझ्या नावातला फरक समजतो का? : रेणुका शाहणे

तृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच ‘ठरलं’ ; ‘या’ उद्योगपतीसोबत करणार विवाह

#video :’भारत-पाक’मध्ये सोशल ‘वॉर’ ; ‘मौका मौका’ची ‘ही’ नवी जाहिरात पाहिलीत का ?

बरं झालं ! भारत-पाक क्रिकेट सामन्यात पाऊस पडला तर टीम इंडियाच ‘सरस’ ; जाणून घ्या काय आहे कारण

Loading...
You might also like