भारतीय सैन्याकडून 10 पाकिस्तानी सैन्यासह अनेक दहशतवाद्यांचा ‘खात्मा’, 3 तळ उध्दवस्त : लष्कर प्रमुख बिपीन रावत (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानकडून आत्तापर्यंत 2500 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. सीमेवर घुसखोरी करणार्‍यांना पाकिस्तानकडून नेहमी मदत केली जाते. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं मोहिम उघडली आहे. भारतीय सैन्यानं आज (रविवार) पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे 3 तळ उध्दवस्त केले आहेत. भारतीय जवानांकडून आर्टिलरी बंदुकीचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये 5-10 पाकिस्तानी सैनिक आणि अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा म्हणजेच कलम 370 हटवल्यानंतर पासुन पाकिस्तान कमालीचा गडबडला असून वेळावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने चुकीचे काम केल्याचे सांगत आहे. मात्र, पाकिस्तानला त्यामध्ये यश मिळालेले नाही. सीमेवरून भारतीय हद्दीत घुसखोरांना मदत करणार्‍या पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं 2500 वेळेस उल्लंघन झालेले आहे.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने मोहिम उघडली आहे. रविवारी भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घसून आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला चढवला. त्यामध्ये भारतीयांकडून आर्टिलरी बंदुकींचा वापर करण्यात आला. भारतीय जवानांनी केलेल्या या कारवाईमध्ये 6 ते 10 पाकिस्तानी सैनिकांसह अनेक दहशतवादी ठार झाले आहेत तर 3 तळ देखील उध्द्वस्त करण्यात भारतीय लष्कराला यश मिळालं असल्याचं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितलं आहे.

visit : Policenama.com