Indian Bison Pune | भरकटून पुण्याच्या कोथरूड परिसरात आलेल्या रानगव्याच्या मृत्यूची मुंबई हाय कोर्टाने घेतली दखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indian Bison Pune | पुण्यातील कोथरुड (Kothrud News) परिसरात 9 डिसेंबर 2020 मध्ये रानगव्याचं (Indian Bison Pune) आगमन झालं होतं. त्या परिसरात जवळपास 7 तासाहून जास्त वेळ रानगव्याने धुमाकूळ घातला होता. भरकटून आल्याने रानगव्याला बाहेर जाता येत नव्हतं. तेव्हा जमावांनी रानगव्याचे फोटो काढण्यास सुरुवात केले. माेबाइलमध्ये चित्रफित कैद केले. जमावाचा गोंधळ उडाल्याने घाबरलेला रानगवा भयभीत झाला होता. अखेर त्याला वनविभागाने ताब्यात घेतले. त्यावेळी इकडे-तिकडे भटकल्याने त्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान गव्याचा मृत्यू (Died) झाला आहे.

 

कोथरूड परिसरात रानगवा शिरल्याने माणसाने मोठी गर्दी केली होती. दरम्यान, नागरी वस्तीमध्ये शिरलेल्या रानगव्याच्या (Indian Bison Pune) मृत्यूची दखल आता मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) घेतली आहे. महाराष्ट्र वनविभाग (Maharashtra Forest Department) आणि पुणे पोलीस आयुक्त (Pune Police Commissioner) यांना हाय कोर्टाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता (Justice Dipankar Datta) आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक (Justice M. S. Karnik) यांच्या खंडपीठाने याबाबत नोटीस पाठविली आहे. यामध्ये 17 जानेवारीपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान, नागरी वस्तीत रानगव्याने प्रवेश केल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमाव झाला होता. तर, कुत्र्यांच्या हल्ल्यात हा रानगवा जखमी झाला. गर्दीला घाबरून भयभीत गव्याने तिथून जाण्याचा प्रयत्न केला. पण स्टीलच्या गेटला अंदाधुंद धडका दिल्याने त्यातही त्याला थोड्या जखमा झाल्या. दरम्यान, शवविच्छेदन रिपोर्टमधून स्पष्ट झाले की हृदयविकाराच्या झटक्याने गव्याचा मृत्यू (Died) झाला. या प्रकरणी वनरक्षक दलाचे अधिकारी गव्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘लॉयर्स फॉर अर्थ जस्टीस ‘ या वकिलांच्या पथकाने वकील असीम सरोदे (Lawyer Asim Sarode) यांच्यातर्फे डिसेंबर 2020 मध्ये हाय कोर्टात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर, तब्बल 1 वर्षाने ही याचिका सुनावणीस समोर घेतली गेली.

 

Web Title :- Indian Bison Pune | Mumbai high court finds death Indian Bison animal kothrud area pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jaya Bachchan | सून ऐश्वर्या रायची ED ने केली चौकशी ! जया बच्चन यांनी भाजपला दिला शाप; म्हणाल्या – ‘वाईट दिवस लवकरच येतील’

Nashik Crime | संतापजनक ! लहान मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून महिलेवर बलात्कार; महाराष्ट्रातील खळबळजनक घटना

Sayaka Kanda Dies | हॉटेलच्या 22व्या मजल्यावरून पडून अभिनेत्री सायाका कांडा हिचा मृत्यू, पोलिसांना आत्महत्या केल्याचा संशय