Sayaka Kanda Dies | हॉटेलच्या 22व्या मजल्यावरून पडून अभिनेत्री सायाका कांडा हिचा मृत्यू, पोलिसांना आत्महत्या केल्याचा संशय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sayaka Kanda Dies | इडली प्राईड (Idley Pride), स्टार ब्लेझर्स (Star Blazers 2202) आणि कंव्हेंस स्टोर बाॅयफ्रेण्डस (Convenience Store Boyfriends) मधील व्हॉईस-ओव्हरसाठी प्रसिद्ध असलेली जपानी अभिनेत्री सायाका कांडा (Sayaka Kanda Dies) हिचे निधन झाले आहे, असे तिच्या अधिकृत वेबसाइटने जाहीर केले आहे. ती फक्त 35 वर्षांची होती. हॉटेलच्या 22 व्या मजल्यावरून पडल्याने तिचा मृत्यू (Death) झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस हे आत्महत्येचे (Suicide) प्रकरण मानत आहेत, परंतु कट असण्याची शक्यताही नाकारली जात नाही.

सायकाच्या प्रचारकाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिनेत्री सायाका कांडा (Sayaka Kanda) अपघाताची शिकार झाली आहे. सायाका कांडा यांचे 18 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता अचानक निधन झाले. त्याच्या चाहत्यांना अशी बातमी देताना आम्हाला खूप दुःख होत आहे. आम्हालाही या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे, पण सायाका आता आमच्यासोबत नाही हे खरे आहे. कृपया त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा. (Sayaka Kanda Dies)

 

रिपोर्ट्सनुसार, सायाका कांडा ही हॉटेलच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिची खोली 22 व्या मजल्यावर होती आणि तिथून ती खाली पडली होती, तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तिचा जीव वाचू शकला नाही. पोलिस सध्या याला आत्महत्येचे प्रकरण मानत आहेत पण सायकाच्या मित्रांनी ती आत्महत्या करू शकत नसल्याचे सांगत आहे.

Web Title :- Sayaka Kanda Dies | japanese actress sayaka kanda was found dead on saturday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट रेट जारी; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

Food Delivery APP-GST | 1 जानेवारीपासून अ‍ॅपवरून जेवण मागवल्यास लागेल टॅक्स! ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस महागणार का? जाणून घ्या

MahaTET Exam Paper Leak Case | ‘टीईटी’चा 2018 चा पेपर देखील… ! पुणे पोलिसांकडून राज्य परीक्षा परिषदेचा माजी आयुक्त ‘सुखदेव डेरे’ याच्यासह GA Software चा बंगलुरुचा तत्कालीन संचालक अश्विनकुमारला अटक

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट?, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेच्या अजय गुजर यांच्या माघार घेण्याने संपकरी आक्रमक

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 544 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी