भारतीय उद्योगपतीच्या मुलीच्या शिक्षणासाठी घेतला अख्खा महाल, १२ नोकर दिमतीला

लंडन :

पूर्वी संस्थानिकांची मुले म्हणजेच राजपुत्र, राजकन्या या शिक्षणासाठी परदेशात, किंवा पुणे, मुंबईत आल्या की तेथे संस्थानिक अख्खा बंगला, नोकर चाकर, गाडी पासून सर्व व्यवस्था करीत असत. पुण्यात असे खास मुलांच्या शिक्षणासाठी संस्थानिकांनी बांधलेले बंगले असूनही आहेत. आता त्यांची जागा उद्योगपती, अब्जाधीश यांनी घेतली आहे. मुलीच्या शिक्षणासाठी एका अब्जाधीशाने चक्क महाल घेतला असून तिच्या दिमतीला १२ नोकर ठेवले आहेत.

ब्रिटनमधील एका भारतीय विद्यार्थिनीची मीडियामध्ये जोरदार चर्चा आहे. याचे कारण शैक्षणिक विक्रम किंवा मोठी कामगिरी नाही तर शाही ऐशो आराम आहे. ‘द स्कॉटिश सन’मधील वृत्तानुसार, एका भारतीय अब्जाधीशाची मुलगी स्कॉटलंडच्या सेंड अँर्ड्यूज युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे. मुलीच्या शिक्षणासाठी पालकांनी आलिशान महलासोबत १२ नोकरांची व्यवस्था केली आहे. या १२ जणांच्या स्टाफमध्ये विशेषत: आचारी, बटलर, मोलकरीण, घराची साफसफाई करणारा नोकर, माळी, फूटमॅन, चालक यांचा समावेश आहे. एखाद्या भारतीय विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी एवढ्या खर्चिक राहणीमानाचे हे पहिलेच उदाहरण आहे.

आरबीआयच्या नियमांना गुगलची सहमती

या शाही खर्चावर कुटुंबांचे म्हणणे आहे की, आम्ही एलिट क्लासचे असल्याने मुलीच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची कसर ठेवायची नाही. चार वर्षांच्या अभ्यासासाठी महलासोबतच आपल्या कामात निपुण असलेल्या स्टाफच्या नियुक्तीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हे कुटुंब अतिशय श्रीमंत आहे, त्यामुळे फक्त अनुभवी आणि कुशल स्टाफच्या नियुक्तीवर भर देण्यात आला आहे. बटलरचे काम विशेषत: मेन्यू पाहण्याचे आणि टीम जेवण कसे बनवतेय यावर देखरेख करण्याचे असेल. तर फुटमॅनचं काम जेवण वाढण्याचे आणि टेबलाची स्वच्छता करण्याचे असेल.
[amazon_link asins=’B009WNA9V6,B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8eeebc08-b588-11e8-bc8b-8953eda4a7c8′]
कुटुंबाने नोकरासाठी दिलेल्या जाहिरातीत ‘आनंदी, ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण’ व्यक्तीची गरज असल्याचे लिहिले आहे. यासोबतच पर्सनल स्टाफसाठी कामाची जी यादी आहे, त्यात गरजेच्या वेळी दरवाजा उघडणं, दुस-या स्टाफसोबत रुटीन शेड्यूल बनवणे, वॉर्डरोब मॅनेजमेंट आणि पर्सनल शॉपिंगचाही समावेश आहे. गरजेच्या वेळी कायम दरवाजा उघडण्यासाठी तयार असलेल्या स्टाफचा पगार सुमारे ३० हजार पौंड प्रति वर्ष आहे.