(ICG) भारतीय तटरक्षक दलाच्या मेगा भरतीमध्ये मुदतवाढ

पुणे : पोलीसनामा टीम – इंडियन कोस्ट गार्ड (ICG) मध्ये सहाय्यक कमांडंट आणि स्थानिक शाखा कुक आणि १८ ड्राफ्ट्समन, सिव्हील मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, इंजिन चालक , सारंग लास्कर आणि लास्कर या पदांसाठी होणाऱ्या भरतीची अर्ज करण्याची तारीख २ दिवस वाढली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १२ जून पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे असतील त्यांनी खालील माहिती वाचून अर्ज करावेत.

पदांचा तपशील :  नाविक डोमेस्टिक ब्राँच

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी ५० गुणांसह १० वी उत्तीर्ण असावा. SC, ST तसेच राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही खेळात पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्याला ५% सूट मिळेल.

शारीरिक पात्रता :

उंची : कमीत कमी १५७ सेमी आणि छाती फुगवून ०५ सेमी जास्त असावी.

वयाची अट : उमेदवाराचा जन्म ०१ ऑक्टोबर १९९७ ते ३१ सप्टेंबर२००१ च्या दरम्यान झालेला असावा. त्यानुसार त्याचे वय १८ ते २२ वर्ष असावे. SC / ST उमेदवारांना ०५ वर्षे सूट तर OBC उमेदवारांना ०३ वर्षे सूट दिली जाईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत कुठेही नोकरी करावी लागेल.

फी : यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवेशपत्र : २० ते २६ जून २०१९ दरम्यान उमेदवाराला आपले प्रवेशपत्र काढता येईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जून २०१९ ही पहिली तारीख होती. यात मुदतवाढ झाल्यामुळे उमेदवाराला १२ जून २०१९ तारखेपर्यंत अर्ज करता येईल.

आरोग्यविषयक वृत्त –

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !