भारतीय क्रिकेट संघाचे पुढील पाच वर्षाच्या दाैऱ्याचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

क्रिकेट प्रेमींसाठी महत्वाची बातमी. भारतीय क्रिकेट संघाचे आघामी पुढील पाच वर्षाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जुलै २०१९ ते मार्च २०२३ या पाच वर्षाचा समावेश आहे. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट संघाचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वन-डे लीग या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत क्रमवारीतले सर्वोत्तम ९ संघ सहभागी होणार आहेत.

वेळापत्रक पुढील पाच वर्षाचे-

भारतात खेळले जाणारे कसोटी सामने

  • ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१९ : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ तर बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका
  • जानेवारी ते मार्च २०२१ : इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका
  • नोव्हेंबर २०२१ : न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका
  • फेब्रुवारी २०२२ : श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका
  • ऑक्टोबर २०२२ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका

परदेशात खेळले जाणारे कसोटी सामने

  • जुलै २०१९ : वेस्ट इंडिज विरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका
  • फेब्रुवारी २०२० : न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका
  • नोव्हेंबर ते डिसेंबर २०२० : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका
  • जून ते ऑगस्ट २०२१ : इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका
  • डिसेंबर २०२१ : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका
  • नोव्हेंबर २०२२ : बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका

भारतात खेळले जाणारे मर्यादीत षटकांचे सामने

  • नोव्हेंबर २०१९ : बांगलादेशविरुद्ध दोन टी-२०
  • डिसेंबर २०१९ : वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२०
  • जानेवारी २०२० : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
  • मार्च २०२० : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२० : इंग्लंडविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • मार्च २०२१ : अफगाणिस्तानविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
  • ऑक्टोबर २०२१ : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • नोव्हेंबर ते डिसेंबर २०२१ : न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • फेब्रुवारी २०२२ : वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • फेब्रुवारी २०२२ : श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • ऑक्टोबर २०२२ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • डिसेंबर २०२२ : श्रीलंकेविरुद्ध ५ वन-डे सामन्यांची मालिका
  • जानेवारी ते फेब्रुवारी २०२३ : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
  • फेब्रुवारी ते मार्च २०२३ : आयसीसी विश्वचषक

    परदेशात खेळले जाणारे मर्यादीत षटकांचे सामने
     
  • जुलै ते ऑगस्ट २०१९ : वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • फेब्रुवारी ते मार्च २०२० : न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका
  • जुलै २०२० : श्रीलंकेविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • ऑगस्ट २०२० : झिम्बाब्वेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
  • ऑक्टोबर २०२० : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२० : ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक
  • नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
  • जुलै २०२१ : श्रीलंकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
  • डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • मार्च २०२२ : न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
  • जुलै २०२२ : इंग्लंडविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका
  • ऑगस्ट २०२२ : वेस्ट इंडिजविरुद्ध ३ टी-२० व ३ वन-डे सामन्यांची मालिका
  • नोव्हेंबर २०२२ : बांगलादेशविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका