लग्नानंतर किचनमध्ये काम करताना दिसली नेहा कक्कड, सोशल मीडियावर फोटो वायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  सोशल मीडियावर सक्रिय राहणारी दिग्गज प्लेबॅक सिंगर नेहा कक्कड नेहमी आपल्या पर्सनल लाइफशी संबंधीत गोष्टी सोशल मीडियावर शेयर करत असते. काही दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेली नेहा कक्कड सध्या घरातील काम शिकत आहे. नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपली काही छायाचित्रे शेयर केली आहेत. नेहाने या छायाचित्रांद्वारे आपल्या मूड्सचे व्हेरिएशन दाखवले आहे की, जेव्हा ती किचनमध्ये काम करत असते आणि जेव्हा ती लिव्हिंग रूममध्ये असते तेव्हा तिच्या मूडमध्ये कोणता फरक होतो.

ब्ल्यू जीन्ससह यलो टॉप आणि यलो श्रग घातलेली नेहा हातात बॉल घेऊन काहीतरी फेटताना दिसत आहे. किचनमध्ये क्लिक केलेल्या या फोटोत नेहा मनापासून हसताना दिसत आहे. बॅकग्राउंडमध्ये तिचा डिझायनर किचन सुद्धा स्पष्ट दिसत आहे. तर लिव्हिंग रूममधील फोटोंमध्ये नेहा स्टाइलने पोझ देताना दिसत आहे. ही छायाचित्रे शेयर करताना तिने लिहिले आहे की, जेव्हा मी किचनमध्ये असते आणि जेव्हा लिव्हिंग रूममध्ये असते.

नेहा कक्कडचा पती रोहनप्रीत सिंह सुद्धा सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह असतो. या छायाचित्रांवर रोहनप्रीतने कमेंट बॉक्समध्ये आपली रिअ‍ॅक्शन दिली आहे. रोहनप्रीतने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, ‘हे समाधानाचे स्माइल मी संपूर्ण आयुष्यभर पहात राहीन.‘ या कमेंटसोबत त्याने अनेक इमोजीसुद्धा बनवले आहेत, ज्यांच्या द्वारे आपले इमोशन्स शेयर करण्याचा प्रयत्न केल आहे.

वायरल झाले होते बेबी बंपवाले छायाचित्र

काही दिवसांपूर्वी नेहा कक्कड आणि रोहनप्रीत यांचे एक छायाचित्र समोर आले होते, ज्यामध्ये नेहा कक्कड बेबी बंपसह दिसत होती. छायाचित्र पाहिल्यानंतर आंदाज वर्तवण्यास सुरूवात झाली होती की, नेहा कक्कड प्रेग्नंट आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र वेगाने वायरल झाले होते, ज्यानंतर समजले की, प्रत्यक्षात नेहा कक्कडचे एक गाणे रिलिज होणार होते, ज्यामध्ये नेहा आणि रोहनप्रीतने लीड रोल प्ले केला होता.