इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) सुरु केलीय Covid 19 हेल्पलाइनची सेवा; आता 24 तास मिळणार मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनामुळे अधिक बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून आता इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) एक छान सेवा आणली आहे. ही सेवा म्हणजेच देशभरात पसरलेल्या डॉक्टरांच्या या संघटनेने कोव्हीड हेल्पलाइन चालू केले आहे. या चांगल्या उपक्रमातून रूग्णांना २४ तास मदत दिली जाणार आहे. खास करून ही हेल्पलाइन सुरु केलेली जवळपास २५० डॉक्टरांचा स्टाफ कोरोनाबाबत सगळ्या प्रकारची मदत पुरवणार आहे. या माध्यमातून लोकांच्या अनेक शंकांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

IMN 95975757454 या क्रमांकावर हेल्पलाइन सुरु करण्यात आलीय. देशातील नागरिक या दिलेल्या क्रमांकावर कॉल करून कोरोनाबाबतची सर्व माहिती घेऊ शकणार आहे. तर या हेल्पलाइनमध्ये अशी व्यवस्था केली गेली आहे, जेणेकरुन लोकांना प्रत्येक स्थितीमध्ये सहकार्य करणे शक्य होणार आहे. असे IMA चे अध्यक्ष डॉ. जे ए जयलाल यांनी म्हटले आहे. तसेच, भारतात कोरोनाचं संक्रमण गतीने वाढत आहे. गुरुवारी देशात जवळपास २ लाख १७ हजार नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्येही महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक यासारख्या राज्यांमधील परिस्थिती अधिक भयावह झालीय.

या हेल्पलाइनद्वारे कोणती माहिती मिळेल?

–  रुग्णालयांमधील कोरोना बेडपासून व्हेंटिलेटर आणि ICU बेडची सुविधा

–  सेल्फ किंवा गृह विलगीकरणाच्या (Home Quarantine) दरम्यान घ्यावयाची काळजी

–  कोरोना झाल्यास घरीच करायचे उपाय

–  लसीबद्दलची जागरुकता, छोट्या घरांमध्ये रुग्ण आणि कुटुंबीयांनी घ्यावयाची काळजी