Indian Post च्या ‘या’ योजनेत केवळ 95 रुपयांची करा गुंतवणूक, रिटर्नमध्ये मिळतील पूर्ण 14 लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Post | पोस्ट ऑफिस आणि एलआयसी देशात अशा योजना आणत आहे ज्यात मध्यम आणि गरीब वर्गातील लोक देखील गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफिसची अशीच एक छोटी बचत योजना (Post Office Small Saving Scheme) आहे जिचे नाव ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (Gram Sumangal Rural Postal Life Insurance) आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त 95 रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये मनी बॅक (Money Back) चा सुद्धा लाभ मिळेल. (Indian Post)

 

ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्सची वैशिष्ट्ये –

या योजनेत दररोज केवळ 95 रुपये गुंतवल्यास, मॅच्युरिटीवर 14 लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो.

ह्या योजनेत गुंतवणूक केल्याने मनी बॅकचा लाभ मिळतो.

या योजनेत 19 वर्षे ते 45 वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करू शकता.

ही पॉलिसी 15 किंवा 20 वर्षांसाठी खरेदी करू शकता.

वयाच्या 40 व्या वर्षी पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी 20 वर्षांनी वयाच्या 60 व्या वर्षी होईल. 45 व्या वर्षी पॉलिसी खरेदी केली तर फक्त 15 वर्षे गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

– जर 15 वर्षांची पॉलिसी निवडली असेल, तर 6, 9 आणि 12 वर्षांसाठी 20 टक्के पैसे परत मिळतील. त्याच वेळी, मॅच्युरिटीवर 40 टक्के मनी बॅक उपलब्ध असेल. (Indian Post)

 

इतका भरावा लागेल हप्ता –
जर वयाच्या 25 व्या वर्षी ही पॉलिसी 20 वर्षांसाठी घेतली असेल तर किमान 7 लाखांचा विमा मिळेल. मॅच्युरिटी वयाच्या 45 व्या वर्षी मिळेल. यामध्ये दरमहा 2850 रुपये म्हणजेच रोज 95 रुपये जमा करावे लागतील. तीन महिन्यांसाठी 8,850 रुपये, 6 महिन्यांसाठी 17,100 रुपये जमा करावे लागतील. वयाच्या 45 व्या वर्षी 14 लाख रुपयांचा पूर्ण लाभ मिळेल.

 

Web Title :- Indian Post | gram sumangal rural postal life insurance scheme invest 95 rupees per day and get 14 lakh return

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा