Indian Railways | प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती ! IRCTC App वरून दरमहा 12 रेल्वेची तिकीटे काढता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी (Railway Passengers) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. इंडियन रेल्वे (Indian Railways) केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने याबाबत खुशखबर दिली आहे. आता IRCTC अ‍ॅपवरून प्रवाशांना महिन्याला बारा तिकीटे बुक (IRCTC Ticket Booking) करता येणार आहेत. संकेतस्थळ आणि अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट बुक करता येणार आहेत. सहा पेक्षा अधिक तिकीटे बुक करण्यासाठी आधार लिंक (Aadhaar link) करणे अनिवार्य असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

महिलांना 6 पेक्षा जादा तिकीटे बुक करण्यासाठी आधार लिंक करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अ‍ॅपवरून तुम्हाला तुमचे आधार लिंक करता येणार आहे. त्याचबरोबर 6 पेक्षा जादा तिकीट घेतलेल्या लोकांपैकी एकाचे आधार लिंक असणे आवश्यक असल्याचे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आलं आहे. तसेच, तिकिटाचे पैसे तुम्ही कोणत्याही UPI अ‍ॅपच्या मदतीने देऊ शकता. या निर्णयाचा फायदा प्रवाशांना होणार आहे. अशी माहिती IRCTC ने दिली आहे. (Indian Railways)

 

या दरम्यान, रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे मार्फत तत्काळ तिकिटांसाठी नवीन अ‍ॅप लाँच करण्यात आलेय. ‘कन्फर्म तिकीट’ या नावाने हे अ‍ॅप लाँच करण्यात आले होते. दरम्यान वाढत्या ऑनलाईन सेवा (Online Service) पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title :- Indian Railways | 12 ticket booking per month new rule app irctc

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा