Indian Railways | या आहेत देशाच्या २ VVIP रेल्वे गाड्या, ज्यांना मार्ग देण्यासाठी थांबतात वंदे भारत आणि शताब्दीसारख्या ‘एलीट ट्रेन’

नवी दिल्ली : Indian Railways | जगात रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय रेल्वेतून (Indian Railways) दररोज सुमारे ४ कोटी लोक प्रवास करतात. या गाड्यांमध्ये केवळ प्रवासीच नाही तर मालगाड्यांचा सुद्धा समावेश आहे, ज्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची वाहतूक करून अर्थव्यवस्थेत वाढ करण्यात महत्त्वाचे योगदान देतात (High Priority Train).

भारतीय रेल्वेच्या या विशेष गाड्या
भारतीय रेल्वेच्या गाड्यांबद्दल बोलायचे तर इंटरसिटी (Intercity), मेल (Mail), सुपरफास्ट (Superfast), एक्सप्रेस (Express), राजधानी (Rajdhani) आणि शताब्दी एक्सप्रेस (Shatabdi Express) अशा गाड्या आहेत. आता यामध्ये वंदे भारत गाड्यांचा (Vande Bharat Railway) समावेश झाला आहे. आगामी काळात बुलेट ट्रेन (Bullet Train) देखील या यादीत समावेश होईल. सध्या वंदे भारत गाड्या सर्वात वेगवान मानल्या जातात, ज्यांना मार्ग देण्यासाठी (High Priority Train) इतर गाड्या थांबवल्या जातात.

या २ व्हीव्हीआयपी गाड्यांना मार्ग देतात सर्व ट्रेन
भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways Interesting Facts) अशा २ गाड्या आहेत, ज्यांना मार्ग देण्यासाठी वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस सारख्या उच्चभ्रू गाड्या देखील बाजूला उभ्या केल्या जातात. सामान्य लोकांना या दोन स्पेशल ट्रेन्सबद्दल फारशी माहिती नाही. पण रेल्वेशी संबंधित सर्व लोकांना या दोन ट्रेन्सची चांगली माहिती आहे. ते त्यांना व्हीव्हीआयपी ट्रेनचा दर्जा देतात.

अ‍ॅक्सिडेंट रिलिफ मेडिकल इक्विपमेंट ट्रेन
यापैकी पहिल्या व्हीव्हीआयपी ट्रेनचे नाव अ‍ॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट ट्रेन
(Accident Relief Medical Equipment Train) आहे. या ट्रेनचा उपयोग रेल्वे अपघातादरम्यान तात्काळ मदत
आणि उपचार सुविधा पुरवण्यासाठी केला जातो. या ट्रेनमध्ये डॉक्टर, नर्सेससह सर्व वैद्यकीय उपकरणे असतात,
ज्याद्वारे अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला जातो.

राष्ट्रपतींच्या गाडीला दिला जातो मार्ग
अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हीव्हीआयपी ट्रेनचे नाव प्रेसिडेंट ट्रेन (President Special Train) आहे.
या ट्रेनमध्ये देशाचे राष्ट्रपती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.
ही गाडी धावत असताना त्या मार्गावरील सर्व गाड्या स्थानकांवर थांबवल्या जातात.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद कानपूरमधील आपल्या गावी याच ट्रेनने गेले होते.
सध्या, राष्ट्रपती विमान किंवा हेलिकॉप्टरमधूनच प्रवास करतात, त्यामुळे ही ट्रेन क्वचितच रुळावर दिसते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | खळबळजनक! पोलीस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीची हत्या करुन पतीनेही संपवले जीवन

Personal Loan Interest Rates | पर्सनल लोन घेण्याचा विचार करताय, या बँका देत आहेत सर्वात कमी व्याजावर कर्ज

Tomato Price Update | नेपाळचे टोमॅटो आल्याने खाली आला भाव, किरकोळ बाजारात इतके रुपये किलो झाली किंमत