Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! 2 वर्षानंतर आता पुन्हा रेल्वे सुरू करणार ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railways | भारतीय रेल्वेने ही मोठी सुविधा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरेतर, रेल्वे मंत्रालयाने (Rail Ministry) पुन्हा लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना ब्लँकेट (Blanket) आणि बेडिंग (Bedroll) देण्याची घोषणा केली आहे. (Indian Railways)

 

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा (Big Relief To Railway Passengers)

भारतीय रेल्वेने (Indian Railways) मार्च – 2020 पासून प्रवाशांना चादर, उशी आणि ब्लँकेट (Blanket And Bedroll) देणे बंद केले होते. कोरोना महामारीमुळे प्रवाशांना ही सुविधा मिळत नव्हती. मात्र आता ही सेवा तातडीने लागू करण्याची घोषणा रेल्वेने केली आहे. म्हणजेच आजपासून प्रवाशांना प्रवासादरम्यान ब्लँकेट आणि चादर मिळणार आहेत.

यासाठी, रेल्वे बोर्डाने (Railway Board) सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांना दिलेल्या आदेशात, या वस्तूंचा पुरवठा त्वरित प्रभावाने पुन्हा सुरू करण्यात यावा, असे म्हटले आहे.

 

बेडरोलसाठी सातत्याने मागणी (Passengers Were Constantly Demanding For Bedroll)

कोरोनाचे रुग्ण कमी होताच बेडरोलची मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती.
कारण आता प्रवाशांना घरातून ब्लँकेट आणि चादरी सोबत घेऊन जाव्या लागतात, त्यामुळे अतिरिक्त सामान सोबत नेले जाते.

रेल्वेने सर्व गाड्यांच्या एसी डब्यांमध्ये (AC Coach) ब्लँकेट, उशा आणि चादरींची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गरीब रथ सारख्या गाड्यांमध्ये ही पर्यायी सुविधा आहे.
आता कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झालेली घट पाहता रेल्वेने ही सुविधा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

मार्च – 2020 मध्ये ही सुविधा बंद केल्यानंतर, काही दिवसांसाठी रेल्वेकडून डिस्पोजेबल बेडरोल किट्स (Disposable Bedroll Kit) प्रवाशांना पुरवले जात होते.
त्यासाठी प्रवाशांना वेगळे पैसे मोजावे लागत होते. मात्र नंतर तेही बंद करण्यात आले.

 

Web Title :- Indian Railways | indian railways restores provision of blanket and bedroll in trains

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा