PM Kisan Mandhan Yojana | शेतकर्‍यांना सरकार देईल 36 हजार रुपये, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – PM Kisan Mandhan Yojana | भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण असे असूनही शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. आर्थिक नुकसानीमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागत आहे. पीएम किसान मानधन योजनेसह (PM Kisan Mandhan Yojana) शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार अनेक महत्त्वाच्या योजना राबवत आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत शेतकर्‍यांना दरवर्षी 36 हजार रुपये दिले जातात. मात्र, सरकार ही रक्कम शेतकर्‍यांना पेन्शन स्वरूपात देते आणि दरमहा 3 हजार रुपये मिळतात.

पेन्शनसाठी जमा करावे लागतील थोडे पैसे

पीएम किसान मानधन योजनेसाठी शेतकर्‍यांना दरवर्षी अत्यंत नाममात्र रक्कम जमा करावी लागते. 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

वयोमानानुसार शेतकर्‍याने दरमहा किती रक्कम जमा करायची हे ठरविले जाते.
ही रक्कम 55 ते 200 रुपये दरमहा होते. या पेन्शन फंडची (Pension Fund) लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (LIC) देखरेख केली जाते.

पीएम किसान मानधन योजनेनुसार, ज्या शेतकर्‍यांचे वय 18 ते 29 वर्षे दरम्यान आहे,
त्यांना 55 ते 109 रुपये जमा करावे लागतील.
30 ते 39 वर्षे वयोगटातील शेतकर्‍यांना दरमहा 110 ते 199 रुपयांपर्यंत हप्ता भरावा लागेल.

याशिवाय जो शेतकरी वयाच्या 40 व्या वर्षी ही योजना घेईल, त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.
शेतकर्‍याला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर सरकार दरवर्षी 36 हजार रुपये आणि दरमहा 3 हजार रुपये देते.

 

Web Title :- PM Kisan Mandhan Yojana | pm kisan mandhan yojana farmers will get rs 36000 every year and three thousand monthly know what they have to do

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Pankaj Singh | अजित पवारांचे रेकॉर्ड भाजपच्या या आमदारानं मोडलं, जाणून घ्या

 

TCS Share Buyback | खुली झाली 18000 कोटीची ऑफर, भाग घ्यावा का; अगोदर जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

 

RBI FD Rules Changed | आरबीआयने एफडीचे बदलले नियम ! जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान