Jaundice Home Remedies | लिव्हर खराब झाल्याने होऊ शकते कावीळ, जाणून घ्या लक्षण आणि उपचार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Jaundice Home Remedies | कावीळ किंवा जॉन्डीस (Jaundice) हा एक आजार आहे, ज्यामुळे त्वचा (Skin), डोळे (Eyes) आणि नखे (Nails) यांचा रंग पिवळा होतो. हा आजार दूषित पाण्यामुळे होतो. काविळीमुळे रुग्णाला अशक्तपणा (Weakness) येऊ लागतो आणि शरीरात अनेक बदलही दिसून (Jaundice Home Remedies) येतात. कावीळ किंवा काविळीमुळे लिव्हरवर (Liver) परिणाम होतो.

 

लिव्हर कमकुवत (Liver Weak) असेल तर काविळीचा धोका (Risk of Jaundice) वाढतो. रक्तातील बिलीरुबिनची (Bilirubin) पातळी वाढल्यामुळे कावीळ होते. बिलीरुबिन लाल रक्तपेशींच्या (Red Blood Cell) विघटनाने बनते.

 

रक्तामध्ये 1% बिलीरुबिन असते, परंतु जर त्याचे प्रमाण 2.5% पेक्षा जास्त असेल तर कावीळ होते. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. या आजारामुळे त्वचा, नखे आणि लघवी पिवळी पडते.

 

हा पिवळा (Yellow) रंग बिलीरुबिनच्या वाढीव पातळीमुळे असतो, जो पिवळ्या-नारंगी रंगाचे बाईल पिगमेंट (Bile Pigment) म्हणजेच पित्त रंगद्रव्य आहे. हे बाईल लिव्हरद्वारे सोडले जाते.

 

काविळीची लक्षणे (Symptoms Of Jaundice) ओळखून त्यावर त्वरित उपचार करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कावीळ किंवा हिपॅटायटीस ए (Hepatitis A) हा आजार झाला असेल तर पाण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. काविळीची लक्षणे कोणती आणि त्यावर उपचार (Jaundice Home Remedies) कसे करावे हे जाणून घेऊया.

 

कावीळची लक्षणे (Symptoms Of Jaundice) :

1. शरीरात अशक्तपणा (Body Weakness)

2. लघवी पिवळसर होणे (Yellow Urine)

3. डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर होणे

4. नखे पिवळी पडणे (Nails Turn Yellow)

5. डोकेदुखी (Headache)

6. ताप येणे (Fever)

7. मळमळ होणे (Nausea)

8. भूक न लागणे (Loss Of Appetite)

9. थकवा येणे (Fatigue)

10. बद्धकोष्ठतेच्या तक्रारी (Constipation)

शरीरात अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.

 

काविळीवर घरगुती उपचार (Home Remedies for Jaundice)

1. धने सेवन करा (Eat Coriander) :
काविळीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर स्वयंपाकघरात असलेले धने (Coriander) सेवन करा. धणे एक असा मसाला आहे जो कावीळ नियंत्रित करू शकतो. धने पाण्यात भिजवून खा.

रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा धने टाकून सकाळी सेवन करा, फायदा होईल.

 

2. उसाचा रस प्या (Drink Sugarcane Juice) :
उसाचा रस (Sugarcane Juice) प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. ज्यांना काविळीची लक्षणे दिसतात त्यांनी उसाचा रस घ्यावा.

 

3. व्हिटॅमिन सीचे सेवन करा (Take Vitamin C) :
काविळीच्या उपचारात आहाराचा महत्त्वाचा वाटा आहे, या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लिंबू (Lemon), संत्री (Orange), करवंद आणि टोमॅटो (Tomato) आहारात घ्या.

 

4. ताक प्या (Drink Buttermilk) :
काविळीवर ताक (Buttermilk) खूप प्रभावी आहे. ताक सेवन केल्याने पचनक्रिया (Digestion) व्यवस्थित राहते आणि काविळीची समस्याही दूर होते.

 

5. मुळ्याचा रस प्या (Drink Radish Juice) :
काविळीच्या रुग्णांनी आहारात मुळ्याचे (Radish) सेवन करावे. या आजारावर मुळ्याचा रस खूप प्रभावी आहे.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Jaundice Home Remedies | know the jaundice causes symptoms and home remedies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO यांच्या खात्यात पाठवणार आहे 100 कोटी रुपये, बोर्डाच्या बैठकीत ठेवणार प्रस्ताव


Corporator Pramod Bhangire | जागतिक महिला दिनानिमित्त नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद

 

Pune Crime | पुण्यात राज्यपालाविरुद्ध आंदोलन करणार्‍या ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल