Indian Railways | रेल्वेचा मोठा निर्णय ! आता ट्रेनमध्ये महिलांना सीट मिळण्यात येणार नाही अडचण, मिळेल ‘रिझर्व्ह बर्थ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railways | रेल्वेने महिलांसाठी मोठा उपक्रम राबवला आहे. आता ट्रेनमध्ये महिलांना सीटसाठी अडचण येणार नाही. ज्याप्रकारे बस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांसाठी वेगळ्या सीट राखीव असतात, त्याप्रमाणे आता भारतीय रेल्वेत सुद्धा महिलांसाठी सीट आरक्षित राहतील. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) आता लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये सुद्धा महिला प्रवाशांसाठी बर्थ रिझर्व्ह (special berths for female passengers in Trains) करण्यात आल्या आहेत.

 

महिलांसाठी आरक्षित बर्थ
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (Mail and Express Trains) स्लीपर क्लासमध्ये सहा बर्थ आरक्षित राहतील.

 

गरीब रथ (Garib Rath), राजधानी (Rajdhani), दुरंतोसह पूर्णपणे वातानुकूलित एक्सप्रेस ट्रेनच्या थर्ड एसी कोचमध्ये (3AC class) सहा बर्थ महिला प्रवाशांसाठी (female passengers) आरक्षित करण्यात आले आहेत. (Indian Railways)

स्लीपर कोचमध्ये सुद्धा आरक्षण
प्रत्येक स्लीपर कोचमध्ये (Sleeper class) सहा ते सात लोअर बर्थ (lower berths), वातानुकूलित 3 टियर (3 एसी) मध्ये कोचमध्ये चार ते पाच लोअर बर्थ आणि वातानुकूलित 2 टियर (2 एसी) कोचमध्ये तीन ते चार लोअर बर्थ वरिष्ठ नागरिकांसाठी (senior citizens), 45 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या महिला प्रवाशी आणि गरोदर महिलांसाठी (pregnant women) आरक्षित करण्यात आल्या आहेत.

 

रिझर्व्हेशन ट्रेनमध्ये त्या श्रेणीच्या डब्ब्यांच्या संख्येच्या आधारावर केले जाईल. रेल्वेमंत्री म्हणाले रेल्वे महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे.

 

Web Title :- Indian Railways | indian railways to earmark special berths for female passengers know details here IRCTC

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MoRTH | आता कमी होईल अपघाताचा धोका ! रोड सेफ्टी फीचर्ससह रस्ते मंत्रालयाने लाँच केले नवीन नेव्हीगेशन अ‍ॅप

Pankaja Munde | 2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना खडा सवाल

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 47 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pankaja Munde | ‘ठाकरे सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही’ ! पंकजा मुंडेंनी सांगितलं सत्ता कधी बदलणार

Corporator Pramod Bhangire | प्रमोद भानगिरेंनी स्वखर्चाने केलेल्या प्रभाग 26 मधील विकासकामाचे उद्घाटन; शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले – ‘शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतर नगरसेवकांपेक्षा अधिक सरस’