MoRTH | आता कमी होईल अपघाताचा धोका ! रोड सेफ्टी फीचर्ससह रस्ते मंत्रालयाने लाँच केले नवीन नेव्हीगेशन अ‍ॅप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MoRTH | रस्त्यावर लोकांची सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे अनेक उपाय करत आहेत, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार रस्ता सुरक्षेच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे. यासोबतच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) देशात ड्रायव्हर आणि रोड सेफ्टी टेक्नॉलॉजीसाठी IIT मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी MapmyIndia सोबत कोलॅबोरेट केले आहे.

 

तीन पक्षांनी नागरिकांसाठी एक फ्री-टू-यूज-नेव्हिगेशन अ‍ॅप (Navigation App) लाँच केले आहे, जे रस्त्यावरी दुर्घटनांच्या धोक्याबाबत लोकांना अलर्ट करण्यासह ते अनेक प्रकारच्या रोड सेफ्टी फीचर्ससह येते. (MoRTH)

 

कसे काम करेल नवीन नेव्हिगेशन अ‍ॅप
नेव्हिगेशन अ‍ॅप सर्व्हिस ड्रायव्हरला येणारे अपघात प्रवण क्षेत्र, गतिरोधक, धोकादायक वळणांसह इतर धोक्यांबाबत व्हॉईस आणि व्हिज्युअल अलर्ट देते. हा उपक्रम देशात होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यासाठी रस्ते परिहवन मंत्रालयाच्या प्लानिंगचा एक भाग आहे.

 

MapmyIndia चे डेव्हलप करण्यात आलेले हे नेव्हिगेशन सर्व्हिस अ‍ॅप, ज्यास ‘MOVE’ म्हटले जाते,
त्याने 2020 मध्ये सरकारचे आत्मनिर्भर अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज जिंकले होते. या सर्व्हिसचा वापर नागरिक आणि अथॉरिटीद्वारे अ‍ॅक्सीडेंट,
असुरक्षित एरिया, रस्ता आणि वाहतुकीच्या मुद्द्यांना मॅपवर रिपोर्ट आणि ब्रॉडकॉस्ट आणि दुसर्‍या यूजर्सची मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो.
डेटाचे विश्लेषण IIT मद्रास आणि MapmyIndia द्वारे केले जाईल आणि नंतर भविष्यात रस्त्यांच्या स्थिती सुधारणेसाठी सरकारद्वारे याचा वापर केला जाईल.

 

 

Web Title :- MoRTH | Ministry of Road Transport and Highways with IIT madras launches free to use navigation app for road safety alerts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pankaja Munde | 2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना खडा सवाल

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 47 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pankaja Munde | ‘ठाकरे सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही’ ! पंकजा मुंडेंनी सांगितलं सत्ता कधी बदलणार