Indian Railways | यात्रीगन कृपया ध्यान दें ! आता स्लीपरच्या खर्चात घ्या AC इकॉनॉमी क्लासचा आनंद, ‘या’ पध्दतीची असेल व्यवस्था; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. येत्या काही दिवसात ते स्लीपर क्लासच्या भाड्यात ट्रेनमध्ये एसी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करण्याचा आनंद घेऊ शकतील. कारण, भारतीय रेल्वे (Indian Railways) सध्या आपले जुने कोच अपग्रेड करण्यासाठी वेगाने काम करत आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान रेल्वेने ट्रेनचा कायापालक करण्यास सुरू केली आहे. ज्यामुळे भारतीय रेल्वे (Indian Railways) लवकरच ट्रेनमध्ये एसी इकॉनॉमी क्लास (AC-Economy Class) ची सुरुवात करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

हा भारतात ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी एक नवीन क्लास असेल. इकॉनॉमी क्लासचे कोचला भारतीय रेल्वेच्या अनेक झोनमध्ये आतापर्यंत एकुण 27 कोच दिले आहेत. हे नवीन एसी-इकॉनॉमी कोच पश्चिम रेल्वे अंतर्गत दुरंतो ट्रेन आणि देशाच्या इतर भागात चालणार्‍या ट्रेन्ससोबत जोडले जाईल. इकॉनॉमी क्लासच्या कोचमध्ये 72 बर्थ असू शकता, तर सध्या एसी-3 मध्ये 83 बर्थ असतात. सध्या रेल्वे बोर्ड या क्लासचे भाडे ठरवण्याच्या प्रक्रियेत आहे.

रेल्वे मंत्रालय घेणार प्रवासभाड्यावर औपचारिक निर्णय
इंडियन रेल्वेचे म्हणणे आहे की, या इकॉनॉमिक क्लासचे भाडे तेवढे ठेवले जाईल, जेवढे सामान्यपणे स्लीपर म्हणजे नॉन एसीचे तिकिट असते. मात्र, बहुतांश लोक याचे भाडे थर्ड एसीच्या बरोबरीने ठेवण्याच्या बाजूने आहेत. अधिकार्‍यांनुसार, मे महिन्यापासून हे प्रकरण लटकलेले आहे. रेल्वे मंत्रालय लवकरच याच्या भाड्यावर औपचारिक प्रकारे निर्णय घेऊ शकते.

 

एक्स्ट्रा बर्थसाठी वेगळा बे

नवीन AC-Economy class चे डिझाईन विना एसी स्लीपर क्लासचे अपग्रेड मानले जात आहे. हे जवळपास एसी-3 टियरसारखे असेल. यामध्ये एक्स्ट्रा बर्थसाठी वेगळा बे बनवला जाईल. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, एसी इकॉनॉमी क्लासचे नाव 3ए ठेवले जाऊ शकते. जेणेकरून आरक्षण करताना सोयीचे राहील.

गरीब रथचा प्रयोग फसला होता
एक दशकापूर्वी गरीब रथ ट्रेनमध्ये एसी इकॉनॉमी क्लासची सुरुवात करण्यात आली होती, परंतु हा प्रयोग यशस्वी ठरला नव्हता. याचे कारण हे होते की जास्तीत जास्त लोकांना घेऊन जाण्यासाठी यामध्ये एक्स्ट्रा मिडल बर्थ लावले होते. यामुळे ते आरामदायक ठरले नाही. मात्र नंतर हा क्लास हटवण्यात आला होता.

अशा असतील सीट
यावेळी रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला (Kapurthala) मध्ये खास पद्धतीने एसी इकॉनॉमी क्लासचे कोच तयार करण्यात आले आहेत.
कोच मॉड्यूलर बनवण्यात आले आहेत जेणेकरून प्रवाशांना प्रवास करताना त्रास होऊ नये.
यामध्ये फोल्डेबल स्नॅक्स टेबल, वॉटर बॉटल, मॅग्झीन आणि मोबाइल फोन ठेवण्यासाठी जागाही बनवण्यात आली आहे.
रिडिंग लाईट्स, मोबाइल चार्जिंग पॉईंट आणि स्टँडर्ड सॉकेट सुद्धा प्रत्येक बर्थला लावण्यात आले आहेत.

Web Title :- Indian Railways | indian railways will soon resume ac economy class know how the seats will be

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

Poonam Pandey | पूनम पांडेने देखील राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; Video व्हायरल

Post Office News | 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी ! अनेक पदांसाठी भरती अन् 81100 पर्यंत पगार, जाणून घ्या