भारतीय रूपया घसरला…आणि थेट परदेशात त्यांच्या पोटाला बसला चिमटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मागील काही दिवसांपासून भारतीय रूपयाची डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरण सुरू आहे. या घसरणीचा परिणाम म्हणजे पेट्रोल, डिझेलची दरवाढ आणि पर्यायाने वाढत चाललेली महागाई होय. परंतु, रूपयाच्या घसरणीची ही झळ परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनाही असह्य होऊ लागली आहे. या विद्यार्थ्यांना तेथे डॉलरमध्ये खर्च करावा लागतो. त्यामुळे यामुलांना सध्या तारेवरील कसरत करावी लागत आहे. तर परदेशात शिकणाऱ्या आपल्या मुलांचा खर्च कसा भागवायचा या चिंतेत पालक पडले आहेत.

भारतीय रूपया डॉलरच्या तुलनेत मोठ्याप्रमाणात घसरल्याने परदेशात विशेषत: अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या मुलांचा खर्च वाढला आहे. हा वाढलेला खर्च भागवायचा कसा? या चिंतेने ग्रासलेल्या या मुलांनी तेथे पार्टटाइम जॉब करण्यास सुरूवात केली आहे. तसेच खाण्यापिण्यावरील खर्च कमी करण्यासाठी ते पोटाला चिमटा देत बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी घरातच शिजवून खावू लागले आहेत. याचा परिणाम म्हणजे या मुलांचा बहुतांश वेळ ही कसरत करण्यातच जात असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होऊ लागला आहे.
भारतातील ज्या पालकांची एकापेक्षा जास्त मुले परदेशात शिक्षण घेत आहेत त्यांनाही आपले राहणीमान आणि बचतीमध्ये बदल करावा लागत आहे. कारण रूपया घसरल्याने परदेशात शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या मुलांच्या खर्चात सुमारे ७ ते ९ टक्के वाढ झाली आहे.

रूपयाच्या घसरणीमुळे चिंतातूर झालेल्या पालकांपैकी मुंबईतील वेदक यांनी सांगितले की, माझी दोन मुले अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. सहा महिन्यापूर्वी डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत ६५ रूपयापर्यंत होती. आता ती ७२ रूपयांवर गेली आहे. रूपयाच्या या घसरणीमुळे आम्ही आमच्या मोठ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्याला जाण्याचे टाळले आहे.

नवाज शरीफ यांची शिक्षा स्थगित

प्रकाश वेदक यांनी सांगितले की, मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याचे नियोजन करताना आम्ही रूपयाचे मुल्य ७० रूपये ठरवून दोन मुलांच्या शिक्षणासाठी पैसे बाजूला ठेवले होते. वेदक हे कस्टम क्लियरन्सचा व्यवसाय करतात. ते म्हणाले, रूपया घसरू लागला तेव्हा आम्ही तो पुन्हा पूर्ववत होण्याची वाट पाहत होतो. आम्हाला आशा होती की तो स्थिर होईल. परंतु, रूपया आणखीनच घसरला. आता सध्याच्या दराने मुलांचा अमेरिकेतील खर्च करत आहोत. आम्ही रूपया स्थिर होण्याची वाट पहात बसल्याने त्याचाही फटका बसला. आता आम्हाला लेट फी पेनल्टी भरावी लागत आहे. अशा परिस्थित काय करायचे हेच सुचत नव्हते. रूपयाची घसरण न थांबल्याने अखेर पदवीदान सोहळ्यासाठी युएसला जाण्याचा बेत रद्द करावा लागला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e3af1d1c-bc06-11e8-ba09-41c624fda6a0′]

अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणारा अंकुर वैशंपायन या २२ वर्षीय विद्यार्थ्याने रूपयाच्या घसरणीमुळे दोन आठवड्यापूर्वीच फळे आणि भाज्यांच्या खर्चात कपात केली आहे. अंकुर म्हणतो, आता आरोग्याची काळजी न करता मी कमी पैशातील वस्तू खरदी करतो. माझे बरेचसे मित्र वेळ वाचविण्यासाठी बाहेरचे पदार्थ खातात. परंतु, मी आता पैसे वाचविण्यासाठी स्वयंपाक करतो. शिवाय आठवड्यातून चार वेळा भोपळा व तत्सम प्रकारची स्वस्त भाजी बनवून खातो.

निमिष बांदेकर या २३ वर्षीय विद्यार्थ्याने वायान युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल इंजिनियरींगची मास्टर डिग्री घेण्यासाठी बँकेकडून ३० लाख रूपयांचे कर्ज शैक्षणिक कर्ज काढले आहे. रूपयाची घसरण झाल्याने चवथी टेस्ट परीक्षा कशी द्यायची याची चिंता त्यास सतावू लागली आहे. आता मी पार्टटाईम जॉब करण्याचा विचार करत आहे. तसेच काही पैसे माझे पालक मला देतील, असे निमिष म्हणाला. निमिषचे शैक्षणिक कर्ज जेव्हा एप्रिल महिन्यात मंजूर झाले तेव्हा रूपयाची डॉलरच्या तुलनेत किंमत ६६ रूपये होती.

सप्टेंबर महिन्यात रूपयाची सर्वाधिक घसरण ही ७२.५४ रूपये एवढी झाली आहे. ६ सप्टेंबरपूर्वी रूपयाची किंमत ६५ रूपये प्रति डॉलर होती. रूपयाच्या या मोठ्या घसरणीमुळे परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आता अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
[amazon_link asins=’B0778JFC13,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f1937b41-bc06-11e8-94b2-39a1652d3bf9′]