भारताची कसोटीमधील निचांकी धावसंख्या, 74 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला

अ‍ॅडिलेड : पोलीसनामा ऑनलाइन –  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये भारताने दुसरा डाव ३६ धावांमध्ये आटोपल आणि विराट कोहलीच्या नावावर एक नको असलेला विक्रम नोंदविला गेला. भारताची ही कसोटी क्रिकेटमधील निचांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी ७४ वर्षांपूर्वी अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लडला गेलेल्या भारतीय संघाचा डाव ४२ धावांमध्ये गुंडाळला गेला होता. ही निचांकी धावसंख्या २० जून १९७४ रोजी लॉर्डसवर नोंदविली गेली होती. अवघ्या १७ षटकांमध्ये संपलेल्या या डावात एकनाथ सोलकर यांनी सर्वाधिक १८ धावा केल्या होत्या. ही निचांकी धावसंख्या अद्याप कायम होती.

त्यापूर्वी २८ नोव्हेंबर १९४७ मध्ये ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला केवळ ५८ धावा करता आल्या होत्या. त्यावेळी भारताचा डाव २१.३ षटकात संपला होता. विशेष म्हणजे त्यावेळी ऑस्ट्रेलियात ८ चेंडूचे षटक होते. तसेच १७ जुलै १९५२ रोजी मॅचेस्टरमध्ये इंग्लडने भारताचा डाव ५८ धावांवर गुंडाळला होता. स्वांतत्र्यानंतरच्या पहिल्या काही दशकात भारताचा कसोटीमधील कामगिरी सुमारच राहिली होती. मात्र, गेल्या ३० वर्षात त्यात खुप सुधारणा झाली आहे. तरीही अधूनमधून भारतीय फलंदाज मैदानात संपूर्ण शरणागती स्वीकारताना अनेकदा दिसून आले.
५ वर्षापूर्वी १२ ऑगस्ट २०१५ रोजी श्रीलंकेने गाल्ले येथे भारताचा डाव ११२ धावात गुंडाळला होता.