वेळ पडल्यास पाकिस्तानवर ‘परमाणू’ बॉम्बचा वापर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील ३७० कलम भारताने रद्द केल्यामुळे पाकिस्तान सोबत सध्या चांगलेच तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडला आहे. तरीही पाकिस्तानचे ना पाक कारनामे काही केल्या संपत नाहीयेत. भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत परमाणू हत्यार न वापरायच्या भूमिकेत बदल करू शकतो असे विधान केले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरण येथे सांगितले की, परमाणू हत्यारांबाबत आतापर्यंत देशाची नीती ‘पहिल्यांदा न वापराची’ होती. मात्र भविष्यात काय होणार हे त्या परिस्थितीवर अवलंबून आहे.

राजनाथ सिंह यांनी पोखरण येथे हे विधान केले विशेष म्हणजे याच ठिकाणी १९९८ ला माजी पंतप्रधान अटळ बिहारी वाजपेयी यांनी ५नुक्लिअर टेस्ट केले होते आणि आज अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी आहे.

नो फस्ट युझ (NFU) चा अर्थ असा आहे की, जोपर्यंत समोरील शत्रू आधी हल्ला करत नाही. तोपर्यंत आपण हल्ला करायचा नाही. भारताने पोखरण २ नंतर या पॉलिसीचा स्वीकार केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –