ट्रम्प भारतावर रुसले ? भारताकडून विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा (GSP) काढून घेतला 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेने भारताकडून GSP म्हणजेच विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा काढून घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सिनेटमध्ये ही महत्वपूर्ण माहिती दिली. अमेरिकेने भारत आणि तुर्कस्तानाशी असलेली व्यापारी संधी तोडण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा फटका भारतीय व्यापारावर होणार असून अधिसूचना जारी झाल्यानंतर दोन महिन्यांनी हा बदल लागू होणार आहे. GSP अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारात नव्हते. विशेष म्हणजे अमेरिकेच्या GSP योजनेचा भारत सर्वात मोठा लाभार्थी होता.

का घेतला ट्रम्प यांनी हा निर्णय 
परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी भारतासारख्या देशांशी असलेल्या जागतिक आणि व्दिपक्षीय संबंधांसह विविध मुद्यांवर भाष्य केले. ट्रम्प यांनी नुकतेच GSP भाष्य करत नाराजी व्यक्त केली होती. भारत हा अमेरिकी उत्पादनांवर अधिक आयात शुल्क आकारणारा देश आहे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. किमान कर अथवा बरोबरीचा कर असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कंजर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अ‍ॅक्शन कॉन्फरन्सला (सीपीएसी) संबोधित करताना ते बोलत होते. ट्रम्प म्हणाले की, भारत आमच्या देशावर अधिक शुल्क आकारतो. भारत समसमान कर आकारेल याबाबत शाश्वती नसल्याने भारताचा हा दर्जा काढून घेतल्याचे ट्रम्प यांनी सिनेटमध्ये सांगितले. एकीकडे दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेने भारताची साथ दिली होती मात्र आता अमेरिकेकडून GSP बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

काय होणार परिणाम 
ही योजना विकसनशील देशांसाठी लागू करण्यात आली होती. यानुसार १९७० पासून भारताला ५.६ अब्ज डॉलर्स म्हणजेच ४० हजार कोटी रुपयांच्या निर्यातीवर सूट मिळत होती. आता GSP मधून बाहेर केल्यानंतर भारताला हा फायदा होणार नाहीय.
वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार या निर्णयामुळे अमेरिकेला ५.६अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर कोणताही मोठा प्रभाव पडणार नाही. असे संगितले.

मोदींवरील ‘त्या’ डॉक्युमेंट्रीसाठी जाळली चक्क रेल्वेची बोगी