पुण्यात आता देशी दारूही मिळणार घरपोच !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बध लागू केले आहे. यामुळे अनेक दुकाने बंद केल्याने मद्यापेयींचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता राज्य शासनाने वाईन, बिअर, व्हिस्की, रमसह देशी दारूहीचीही आणि वाईन शॉपमधूनही आता घरपोच सेवा करण्यास परवानगी दिली आहे. मद्य घरपोच करत असताना वाहतूकवेळी अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे असे आदेश जिल्हाधिकारांना राज्य सरकारने दिले आहे. तसेच, राज्य सरकारच्या आदेशांनुसार पुण्यात घरपोच मद्यविक्री अनेक ठिकाणी सुरू झाली आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिली.

राज्य सरकारने बारमधून या पूर्वीच होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आताच्या निर्णयानुसार मद्यविक्री होम डिलिव्हरी मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी आदेश प्रसिद्ध करत त्यानुसार पुण्यात आता वाईन शॉप, बिअर शॉपी (FL2), बिअर बार (Form e), वाईन शॉपी (Form E2), देशा दारू (CL3) आता ग्राहकांना घरपोचद्वारे मिळणार आहे. मूळ किंमतीत (MRP ) ही मद्यविक्री करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कोणत्याही दुकानात प्रत्यक्ष खरेदी करता येणार नाही. आणि दुकानही उघडायचे नाही असे नमूद केले आहे. वाईन शॉप्स, बिअर शॉपी, देशी दारू दुकानदारांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दुकानावर लावायचा आहे. त्यावर ग्राहकांनी संपर्क साधून आपली ऑर्डर नोंदवायची आहे. व्हॉटसअ‍ॅपवर जरी संपर्क साधला तरी, ग्राहकांना घर बसल्या त्यांची ऑर्डर मिळणार आहे. असे राज्य सरकारने बजावले आहे.

दरम्यान, दुकानदारांनी त्यांच्याकडे कामाला असलेल्या कामगारांना उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडे नोंदणी करायची आहे. त्यांच्यामार्फतच ग्राहकांकडे ऑर्डर पुरविली जाणार आहे. तसेच ग्राहकांकडे मद्य सेवन करण्याचा परवाना आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना Day Lyson (एक दिवसांचा मद्य सेवनाचा परवाना) रुपयांत घ्यावे लागणार आहे. संबंधित वाईन शॉपमधूनही Day Lyson ग्राहकांना मिळेल. दरम्यान मद्य घरपोच पोचविण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सशुल्क पोलिस बंदोबस्त मिळावा, अशी सूचना वाईन शॉप असोसिएशनतर्फे अजय देशमुख यांनी केली आहे. एका दुकानावर गृहरक्षक दलाचे २ जवानही बंदोबस्तासाठी पुरेसे ठरतील. त्याचे शुल्क संबंधित दुकानदार पोलिस आयुक्त कार्यालयात जमा करतील, असेही त्यांनी सांगितले आहे.