एकुलत्या एक मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार UGC, मिळणार स्कॉलरशीप, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्या कुटूंबात एकुलती एक मुलगी असेल आणि ती उच्च शिक्षण घेऊ इच्छित असेल तर तुम्हाला आता शिक्षणाच्या खर्चाचे टेंशन नसेल. कारण आता तुमच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च यूजीसी (UGC) उचलणार आहे. यूजीसीने एक मुलगी असलेल्या पालकांच्या शिक्षणावर होणारा खर्च कमी करुन एकुलत्या एका मुलीचा खर्च उचलून त्यांना स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे.

यूजीसीकडून ‘इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड’साठी अर्ज मागवले आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यूजीसीकडून या प्रकारची स्कॉलरशीप देण्याचा उद्देश्य मुलांना उच्च शिक्षण देणे हा आहे. या स्कॉलरशिपचा कालावधी 2 वर्षांचा असणार आहे. तसेच 2 वर्षात जर मुलीने कोर्स सोडला किंवा बदलला किंवा परिक्षेत नापास झाली तर ही स्कॉलरशिप मिळणार नाही.

येवढ्या मुलींना मिळणार स्कॉलरशिप
देशातील 3000 मुलींची यासाठी निवड केली जाईल. या मुलींना स्कॉलरशिपच्या स्वरुपात दरवर्षी 36 हजार 200 रुपये देण्यात येईल. परंतू ज्या मुलींना ही स्कॉलरशीप मिळेल त्यांना इतर स्कॉलरशिपचा लाभ घेता येणार नाही.

यावेळी करावा लागेल अर्ज
स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी पीजी कोर्सच्या नामांकनाच्या आधी पहिल्या वर्षी अर्ज करावा लागेल. तसेच अर्ज करणारी मुलगी सिंगल चाइल्ड असणे आवश्यक आहे. जर अर्जदार जुळे असतील तरी देखील त्यांचे अर्ज मान्य असतील.

असा करा अर्ज
यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर जाऊन स्वत:ची नोंदणी करावी लागेल. त्यात अर्जदाराला शैक्षणिक पात्रता संबंधित प्रमाणपत्र, बँक पासबुकची स्कॅन कॉपी, आधार नंबर अपलोड करावा लागेल. यानंतर स्कॉलरशिप अंतर्गत मिळणारी रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा होतील.

आरोग्यविषयक वृत्त –