‘या’ बहाद्दरानं चक्क 2 गर्लफ्रेन्डशी केलं एकाच मंडपात लग्न, सांगितलं ‘वेगळं’ कारण

जकार्ता : वृत्तसंस्था – एका इंडोनेशियन व्यक्तीने आपल्या दोन्ही गर्लफ्रेंडसोबत लग्न केले आहे. या अनोख्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघींनाही दुखवायचे नव्हते म्हणून त्याने एकाचवेळी दोन्ही गर्लफ्रेण्डशी लग्न केल्याचं कारण सांगितलं आहे.
indonesia-marrige

१७ ऑगस्टला हे लग्न एयरतारप येथे पार पडलं. एवढंच नाही तर मुलाने दोन्ही मुलींच्या घरच्यांना मोठा हुंडाही दिला आहे. इंडोनेशियामध्ये लग्नात मुलांना मुलीच्या घरच्यांना हुंडा द्यावा लागतो. ही तिथली परंपरा आहे. नवरा बायकोची उत्तम काळजी घेऊ शकेल हे दाखवण्यासाठी हा हुंडा दिला जातो.
indonesia-marriage

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या दोन महिलांना एकमेकींसोबत राहण्यास कोणतीही अडचण नाही. दोघीही या लग्नामुळे आनंदी आहेत. इंडोनेशियात बहुविवाह पद्धतीला मान्यता असून एक व्यक्ती चार मुलींशी लग्न करू शकतो. मात्र त्यासाठी एक अट आहे मुलाला मुलीकडच्यांना हुंडा द्यावा लागतो.
indonesia-marrige

आरोग्यविषयक वृत्त –