धक्कादायक ! अनैतिक संबंधाबाबत जाब विचारला म्हणून पत्नीच्या गुप्तांगात घातला मोटारसायकलचा ‘हा’ पार्ट

इंदोर : वृत्तसंस्था – पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याने ३० वर्षीय पत्नीने त्याला जाब विचारला. परंतु पतीला हा प्रकार आवडला नाही. त्यामुळे त्याने तिच्या गुप्तांगात मोटरसायकलच्या हॅंडलचा ग्रीप घातला. मात्र महिलेने ही बाब लाजिरवाणी असल्याने कोणाला सांगितली नाही. परंतु दोन वर्षांनंतर तिला इन्फेक्शन झाल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही ग्रीप बाहेर काढली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

प्रकाश भील उर्फ रामा (३५) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

असा आहे प्रकार

पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून महिला नाराज होती. दरम्यान यामुळे दोघांमध्ये भांडणं होत होती. भांडणानंतर संतापलेल्यापतीने तिला दारू पाजली. त्यानंतर तिच्या गुप्तांगात पतीने मोटरसायकलच्या हँडलचे ग्रीप घातले. त्यानंतर महिलेने अब्रुखातर हा प्रकार कोणाला सांगितला नाही. दोन वर्षे झाली तरी तिने याची वाच्यता केली नाही. त्यानंतर तिच्या संपूर्ण शरीरात इन्फेक्शन पसरले. चालणे फिरणे कठीण झाल्यानंतर तिने थेट पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनाही तिची कहाणी ऐकून मोठा धक्का बसला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

१८ डॉक्टरांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी

महिलेला महाराज यशवंतराव रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर १८ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हॅंडलचे ग्रीप काढण्यात आले. त्यानंतर महिलेची प्रकृती पुढील ७२ तासा गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like