धक्‍कादायक ! नर्सने दिली बाळांतीण महिलेच्या थोबाडीत ; म्हणाली, ‘एवढे का खाल्‍ले की ४.५ किलोचं मुल झालं’

इंदौर : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. येथे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या गरोदर महिलेसोबत गैरवर्तणूक झाली आहे. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी गरोदर महिलेला चापट मारली असा आरोप गरोदर महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. हॉस्पिटलमधील नर्सने म्हटले की, इतके कशाला खाल्‍ले ? एवढे खाल्ल्यामुळे बाळ ४.५ किलोचे झाले आहे. नर्सच्या निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. FIR दाखल झाल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सन्मती नगरात राहणाऱ्या नेहा सारडाची प्रसूती होणार होती. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेहाला अ‍ॅडमिट करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये पोहचल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत केली नाही. २ तासानंतर गरोदर महिलेला १६  इंजेक्शन देण्यात आले.

एवढे का खाल्ले की त्यामुळे बाळ ४.५ किलोचे झाले
नातेवाईकांनी सांगितले की ९ महिन्यांपासून गरोदर महिला डॉ. वंदना तीवारीकडे ट्रीटमेंट घेत आहे. नातेवाईकांनी डॉ. तिवारी यांना सिझेरियन करायला सांगितले तेव्हा नर्सनी गरोदर महिलेला चापट मारून म्हटले की, इतके कशाला खाल्‍ले ? एवढे खाल्ल्यामुळे बाळ ४.५ किलोचे झाले. प्रसूती झाल्यानंतर नर्सनी महिलेच्या पतीला सांगितले की बाळाच्या हृदयाचे ठोके चालू आहेत. मात्र बाळ कोणतीही प्रतिक्रिया देत नाही.

नवजात अर्भकाचा मृत्यू
यानंतर नातेवाईक त्या नवजात अर्भकाला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेले. तेथे डॉ.जफर पठाण यांनी सांगितले की डिलिव्हरीच्या वेळी नीट काळजी न घेतल्यामुळे बाळाची स्थिती धोक्यात आली आहे. बाळाला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु शुक्रवारी बाळाचा मृत्यू झाला.

आरोग्यविषयक वृत्त –

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या