Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाचा सलग दुसरा विजय; व्हिज्डम् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indrani Balan Foundation | स्पोर्ट्सफील्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप (punit balan group) संघाने सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. व्हिज्डम् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने स्पर्धेत विजयी सलामी देत दणक्यात सुरूवात केली. (Indrani Balan Foundation)

 

मुंढवा येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात प्रतिक खांडवे याच्या ६० धावांच्या जोरावर व्हिज्डम् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने शिरूर जिमखाना क्लबचा ११४ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रतिक खांडवे (६० धावा), श्रीकांत सोमवंशी (नाबाद ३४) आणि श्रीपाद निंबाळकर (२५ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर व्हिज्डम् अ‍ॅकॅडमीने १८ षटकात ६ गडी गामवून १७८ धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाला उत्तर देताना शिरूर जिमखाना क्लबचा डाव १८ षटकात ६४ धावांवर गुंडाळला गेला व व्हिज्डम् संघाने विजयी सलामी दिली. (Indrani Balan Foundation)

 

 

पुनित बालन याच्या अष्टपैलू खेळीमुळे पुनित बालन ग्रुप संघाने शिरूर जिमखाना क्लबचा १६८ धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.
पुनित बालन ग्रुप संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९ षटकात २ गडी गमावून २०७ धावांचा डोंगर उभा केला.
यामध्ये आतिश कुंभार (नाबाद ७८ धावा), मेहूल पटेल (नाबाद ४६ धावा), पुनित बालन (३७ धावा), ओंकार खाटपे (२९ धावा)
यांच्या फलंदाजीमुळे २०० धावांचा टप्पा पार केला. या आव्हानाचा पाठलाग करताना शिरूर जिमखाना क्लबचा डाव १२ षटकात ३९ धावांवर गुंडाळला गेला.
गोलंदाजीमध्ये पुनित बालन (३-११), धिरज मंत्री (२-५) आणि आतिश कुंभार (२-१)
यांनी अचूक आणि चमकदार गोलंदाजी करून पुनित बालन संघाचा विजय सोपा केला. (Indrani Balan Foundation)

 

सामन्यांचा सविस्तर निकालः

१) व्हिज्डम् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १८ षटकात ६ गडी बाद १७८ धावा (प्रतिक खांडवे ६० (४२, ७ चौकार),
श्रीकांत सोमवंशी नाबाद ३४, श्रीपाद निंबाळकर २५, सॅम बी. २-२९);(भागिदारी- पाचव्या गड्यासाठी प्रतिक आणि श्रीकांत
यांच्यात ६५ (४३) वि.वि. शिरूर जिमखाना क्लबः १८ षटकात १० गडी बाद ६४ धावा (सॅम बी. २५, चेतन कुरांदळे ११,
विवेक आंची ३-२, प्रथमेश राठोड २-६); सामनावीरः प्रतिक खांडवे;

 

 

२) पुनित बालन ग्रुपः १९ षटकात २ गडी बाद २०७ धावा (आतिश कुंभार नाबाद ७८ (३४, ६ चौकार, ५ षटकार), मेहूल पटेल नाबाद ४६ (१९, ३ चौकार, ४ षटकार), पुनित बालन ३७ (४०, ३ चौकार), ओंकार खाटपे २९);(भागिदारी- पहिल्या गड्यासाठी पुनित आणि ओंकार ५४ (५०); तिसर्‍या गड्यासाठी आतिश आणि मेहूल यांच्या ९६ (४३) वि.वि. शिरूर जिमखाना क्लबः १२ षटकात १० गडी बाद ३९ धावा (दियान कोठारी १२, पुनित बालन ३-११, धिरज मंत्री २-५, आतिश कुंभार २-१); सामनावीरः पुनित बालन;

 

Web Title :- Indrani Balan Foundation | First ‘Indrani Balan Winter T20 League’ cricket tournament! Puneet Balan Group’s second consecutive win; Wisdom Cricket Academy team’s winning opener!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Gopichand Padalkar | ‘आर्यन खान या नशेबाज पोराला वाचविण्यासाठी ठाकरे सरकारचा आटापिटा’ – गोपीचंद पडळकर

Pune Metro | पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर ! डिसेंबर अखेर पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो धावणार

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,095 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी