Indurikar Maharaj | इंदुरीकर महाराजांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल खटला सुरु ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे कॅव्हेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लिंगनिदान दाव्यासंबंधी अशास्त्रीय आणि बेकायदेशीर वक्तव्य करणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यावरील खटला सुरु ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Maharashtra Superstition Eradication Committee) वतीने खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) कॅव्हेट (Caveat) म्हणजे सावधान पत्र दाखल केले जाणार आहे. इंदुरीकर महाराजाच्या (Indurikar Maharaj) वक्तव्यासंदर्भात संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील खटला सुरु ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) 16 जून रोजी देताना खटला रद्द करण्याचा जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द ठरविला आहे.

 

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना त्यांच्या मागणीनुसार पुढील अपील करण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे या काळात ते औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश किशोर संत (Judge Kishore Sant) यांच्या निकालाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने खबरदारी म्हणून कॅव्हेट दाखल केले जाणार आहे, असे समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील (Avinash Patil) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

अविनाश पाटील म्हणाले, इंदुरीकर महाराज यांची सततची महिलांसंबंधी अपमानकारक वक्तव्य आणि
गर्भलिंग निदानासंबंधीचा दावा हा स्त्रियांना दुय्यमत्व देणारा, पुरुषी व्यवस्थेला समर्थन देणारा असल्यामुळे यासंबंधीचा खटाला सुरु ठेवण्याचा
न्यायालयाचा आदेश हा महाराष्ट्रातील स्त्री भ्रूणहत्येला पोषक स्वरुपाचे वर्तन व्यवहार करणाऱ्या सर्वच प्रकारच्या संबंधितांना चपराक देणार आहे.
त्या अर्थाने तो स्त्रियांच्या जन्माच्या अधिकाराला विश्वास आणि स्वतंत्र देणारा आदेश आहे,
असे पाटील यांनी सांगितले. तसेच PCPNDT कायद्यांतर्गत कारवाई होऊन दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली.

 

Web Title :  Indurikar Maharaj | maharashtra annis to continue the case against indurikar maharaj

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme