‘या’ बँकेनं लॉन्च केलं पहिलं मेटल क्रेडिट कार्ड, मिळतील अनेक खास वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने गुरुवारी पहिले मेटल क्रेडिट कार्ड जारी केले. हे कार्ड पायनियर हेरिटेज या नावाने सुरू करण्यात आले आहे. या कार्डच्या मदतीने ग्राहकांना प्रवास, वेसनेस, लाईफस्टाइल यासह अनेक खास वैशिष्ट्ये मिळतील. हे कार्ड विशेष व्यावसायिकांना आणि एंटर प्रन्योर्सना ध्यानात घेऊन काढले गेले आहे. दरम्यान, हे कार्ड वर्ल्ड एलिट प्लॅटफॉर्मचा एक भाग देखील आहे. जाणून घेऊया या कार्डाचे वैशिष्ट्ये..

हे क्रेडिट कार्ड बँकेने अल्ट्रा-हाय नेट वर्थ विभागाच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले आहे. हे कार्ड जगभरातील श्रीमंत लोकांना विविध प्रकारच्या खास सुविधा पुरवते.

इंडसइंड बँक पायनियर हेरिटेज क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये

– या कार्डावर अडीच कोटींचे वैयक्तिक एअर अपघाताचे कव्हर उपलब्ध असेल.

– उशीरा पेमेंट शुल्क, रोख अ‍ॅडव्हान्स फी आणि ओव्हर लिमिट फी आजीवन मोफत असेल.

– आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांच्या लाउंजमध्ये विनामूल्य प्रवेश अमर्यादित आहे.

– सामान हरवल्यास ग्राहकांना एक लाखापर्यंतचे कव्हर मिळतील.

– प्रवासाचे कागदपत्र हरवल्यास 75 हजार रुपयांचे विम्याचे संरक्षण असेल.

– विमा संरक्षण कार्डच्या मर्यादेइतके असेल.

– याखेरीज जर आपण वार्षिक 10 लाखाहून अधिक खर्च केला तर फी भरावी लागणार नाही.

कसा करू शकता अर्ज ?

जर आपल्याला या कार्डासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला इंडसइंड बँक पायनियर लॉन्जला भेट द्यावी लागेल. याशिवाय आपण आपल्या रिलेशनशिप मॅनेजरशी संपर्क साधू शकता.

तसेच, क्रेडिट कार्डशी संबंधित अधिक माहितीसाठी

https://bank.indusind.com/pioneer/personal-banking/cards/pioneer-heritgae-credit-card.html या वेबसाइटवर भेट देऊ शकता.