ICC World Cup 2019 : ‘या’ कारणामुळे पाकिस्तान संघाचा ‘दारूण’ पराभव झाला : सचिन तेंडूलकर

मँचेस्टर : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा दारुण पराभव केला. या सामन्यावर पावसाचे संकट कायम होते. मध्येमध्ये पावसाचा व्यत्यय येऊन सुद्धा सामना खेळला गेला. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रैफर्ड मैदानावर झालेल्या या सामन्यात तीन वेळेस पावसाने व्यत्यय आणला. सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने कोणत्या कारणामुळे पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले हे सांगितले.

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज गोंधळून गेला
सचिन म्हणाला की, पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज भारताविरुद्धच्या सामन्यात गोंधळून गेल्यासारखा दिसत होता आणि त्यामुळे पाकिस्तानच्या संघाकडे चांगल्या रणनीतीचा अभाव दिसून आला. जेव्हा वहाब रियाज गोलंदाजी करत होता तेव्हा सर्फराजने शॉर्ट मिड विकेटला फिल्डर ठेवला होता आणि जेव्हा शादाब गोलंदाजी करत होता तेव्हा सर्फराजने स्लिपमध्ये फिल्डर लावला होता.

वहाबने खूप उशीर केला
सचिन म्हणाला की, अशा परिस्थितीत फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळवणं कठीण होऊन जात. ते पण जेव्हा गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत नाही. कोणत्याही पाकिस्तानच्या गोलंदाजाला परिस्थीतीचा फायदा घेता आला नाही. सचिन म्हणाला की, जेव्हा चेंडू जास्त वळू शकत नाही तेव्हा तुम्ही सलग ओव्हर दि विकेट गोलंदाजी करू शकत नाही. वहाब बराच वेळ झाल्यानंतर अराउंड द विकेट गोलंदाजी करू लागला पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तानसोबत आहे.