Influenza Virus | इन्फल्युएंझा आजाराच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून आढावा

Influenza Virus | Chief Minister Eknath Shinde's review of the influenza situation
file photo

वेळीच उपचार सुरु करण्याबाबत जनजागृती करावी

 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे (Influenza Virus) होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज दिल्या. (Influenza Virus)

 

राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फल्युएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजारा विषयीची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी आज विधान भवन येथे घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

 

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant), वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC Commissioner) इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) , सहआयुक्त संजय कुमार (BMC Joint Commissioner Sanjay Kumar) ,वैद्यकीय शिक्षण सचिव अश्विनी जोशी, सचिव डॉ. नवीन सोना (Dr. Navin Sona), आरोग्य आयुक्त धीरज कुमार (Health Commissioner Dhiraj Kumar), संचालक डॉ. नितीन अंबाडेकर (Dr. Nitin Ambadekar) आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Influenza Virus)

मुख्यमंत्री म्हणाले, या संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत. यासाठी लागणारा औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करावी. तसेच सध्या सुरु असलेल्या कर्मचा-यांच्या संपामुळे उपचार करण्यात अडचण येऊ नये यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी आणि आवश्यकता वाटल्यास खासगी कंत्राटी कर्मचारी नेमुन उपचाराचे काम सुरु ठेवावे.

 

इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. इन्फल्युएंझाचे टाईप A B आणि C, असे प्रकार आहेत. इन्फल्युएंझा टाईप ए चे उपप्रकार H1 N1, H2N2,H3 N2 असे आहेत. यात ताप, खोकला,घशात खवखव , धाप लागणे , न्युमोनिया अशी लक्षणे आढळतात.

 

यासाठी कोविड 19 / इन्फल्युएंझा बाबतीत नियमित रुग्ण सर्वेक्षण, सहवासितांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
यात, रुग्णाच्या सहवासात आल्यापासून दहा दिवसात फ्ल्यू सारखी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.
सर्दी, खोकला अंगावर काढु नका त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लुवरील औषध सुरु करावे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरु केलेल्या उपचारा सोबतच गरम पाण्याची वाफ घ्यावी.
खोकला असल्यास मास्क किंवा तीन पदर करुन हात रुमाल वापरावा.
आजारी व्यकतीनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सुचनांचा समावेश आहे.

 

Web Title :- Influenza Virus | Chief Minister Eknath Shinde’s review of the influenza situation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 25 हजाराच्या लाच प्रकरणी नायब तहसिलदारासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

Pune Crime News | दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वीच खुनातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)