पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बहुतांश कपल्स दिवसभर कामानिमित्त बाहेर असतात. तसेच दोघांपैकी एकजण रात्री उशीरा ऑफिसमधून येतो. दोघेही कामामुळे थकलेले असतात. बदललेल्या जीवनशैलीमुळे आज बहुतांश घरात हेच दृश्य दिसून येते. रात्री घरी आल्यानंतरही काहीजण उशीरापर्यंत काम करत बसतात. त्यामुळे ते आपल्या पार्टनरला वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे अनेकदा दोघांमध्ये दुरावाही निर्माण होतो. मात्र, असा दुरावा निर्माण करण्यापेक्षा पहाटेचा सेक्स हा यावर खूप चांगला उपाय आहे. अनेक जोडपी अशाच पद्धतीने पहाटेच्या सेक्सचा आनंद घेतात. पहाटेच्या वेळी केलेला प्रणय हा वैवाहीक जीवनासह आरोग्यासाठीही लाभदायक आहे. पहाटेच्या या सेक्सविषयी काही महत्वाची माहिती आपण घेणार आहोत.

पहाटे प्रणय करायचा असल्यास रात्री वॉशला आठवणीने जावे. कारण मध्येच तुम्हाला उठावे लागल्यास पार्टनरचा मूड खराब होऊ शकतो. झोपण्यापूर्वी ब्रश करावा. जवळच माऊथ फेशनर ठेवावा. म्हणजे पहाटे सेक्स करण्यापूर्वी त्याचा वापर करता येईल. काही नव्या पद्धतीचा अवलंब करावा. पार्टनरला सेक्सी वेकअप कॉल देऊ शकता. मॉर्निंग सेक्स नॅचरल असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तेव्हा भावना लपवणे शक्य नसते. दिवसाच्या प्रकाशात सेक्स करणे वेगळाच अनुभव असतो. त्यामुळे तुमच्या पार्टनरला पूर्ण साथ द्या. यावेळी तुम्ही वेगवेगळ्या पोझिशन्स सुद्धा वापरू शकता. कारण यावेळी असलेली धुंदी वेगळीच असते त्यामुळे तुम्ही वेगळी पद्धत आवलंबू शकता. लव्ह मेकिंगनंतर पार्टनरला बेड टी द्या. पहाटे प्रणय करणारे लोक हे सकाळी नाश्ता करून बाहेर पडणाऱ्यांपेक्षा हेल्दी आणि आनंदी असतात. पहाटे प्रणय केल्याने दिवसभर मूड चांगला राहतो. ऑक्सीटोसीनचा स्त्राव दिवसभर होत असल्याने दिवसभर प्रेमभावना मनात राहते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. प्रेमभाव टीकून राहतो. केस, नखे आणि त्वचेसाठी पहाटेचा प्रणय लाभदायक ठरतो. आठवड्यात तीन वेळा प्रणय केल्यास हार्टअटॅकचा धोका कमी होतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/