इन्फोसिसने केला आपल्या कर्मचाऱ्यांचा दुप्पट पगार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेने ग्रीन कार्डविषयी केलेल्या कडक अटी तसेच परदेशातून नोकरीसाठी येणाऱ्यांवर लादलेली बंधने यामुळे आयटी क्षेत्रातील रोजगार कमी होत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे एका बाजूला रोजगार गमाविण्याची पाळी येत असताना अधिक कौशल्य असलेल्यांची मागणी वेगाने वाढत आहे. त्यामुळे चांगल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपनीत जाण्यापासून रोखण्यासाठी आघाडीच्या कंपन्या वेगवेगळा फंडा अनुसरत आहे. आघाडीच्या इन्फोसिसने वेगळाच फंडा आणला आहे

तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिस आपल्या कर्मचाऱ्यांची दुप्पट पगारवाढ करत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी कंपनीचा ‘ब्रिज प्रोग्राम’ पूर्ण केलाय अशा कर्मचाऱ्यांची पगारवाढ कंपनीकडून केली जात आहे. अशाप्रकारचे प्रोग्राम कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या कामापेक्षा अधिक कौशल्यपूर्ण काम मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. टीसीएस आणि विप्रोसारख्या अनेक भारतीय आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्याना कंसल्टिंग, आॅटोमेशन, आर्टिफिशल इंटेलिजेस आणि मशीन लर्निंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळावे यासाठी पुढाकार घेत आहेत. अशात इंफोसिसने अर्ध्या डझनपेक्षा जास्त ब्रिज प्रोग्रॅम विकसित केले आहेत.
ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे अशांसाठी इन्फोसिसने एक प्रोग्राम सुरू केला आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ म्हणजे अशी वेळ असते ज्यावेळी कर्मचारी पदोन्नती किंवा जास्त पगाराची नोकरी पाहायला सुरूवात करतो, किंवा पुढील शिक्षण घेण्यासाठी नोकरी सोडतो. अशा कर्मचाऱ्यांसाठी इन्फोसिसने कंसल्टिंग प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक टेस्ट आणि तीन महिन्यांचा पुस्तकी अभ्यासक्रम ठरवण्यात आला आहे. तर दुसऱ्यां टप्प्यात कर्मचाऱ्यांना एक कंसल्टिंग प्रोजेक्टवर ६ महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण करावी लागते. एकदा कर्मचाऱ्यांने हा प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर त्याला जास्त सॅलरीचे पॅकेज आणि पदोन्नती किंवा वेगळे काम करायला मिळते. हा प्रोग्राम पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची ८० ते १२० टक्के पगारवाढ झाली आहे, आतापर्यंत जवळपास ४०० कर्मचाऱ्यांनी हा प्रोग्राम पूर्ण केला आहे.