केंद्र सरकार ‘आयएनएस विराट’ भंगारात विकण्यासाठी काढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलातील विमानवाहक नौका आयएनएस विराट भंगारात काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे जहाज विकण्याचा निर्णय सरकारने घेतला असून सरकारच्या या निर्णयावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लष्कराचा इतिहास आणि वारसा जतन करण्याच्या विचाराऐवजी हे जहाज विकण्याचा सरकार विचार का करत आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

याआधी आयएनएस विक्रांत देखील सरकारने अशाच प्रकारे भंगारात काढून विकले होते. त्यामुळे या जहाजाला देखील तशाच प्रकारे जाऊ देऊ नये, अशी मागणी भारतीयांकडून केली जात होती. मात्र अखेर सरकारने हे जहाज विकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हटले की, आयएनएस विराट विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव आले आहेत, त्यामुळे इच्छुक असणाऱ्या कंपन्यांना ते देण्यात येईल. हे जहाज कोणत्याही राज्याला सोपवण्यात येणार नसून यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येऊ शकतो. त्यामुळे नौदलाशी चर्चा करूनच हे जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, याआधी आयएनएस विक्रांत देखील अशाच प्रकारे विकण्यात आले होते. त्यावेळी त्या जहाजाच्या लोखंडापासून बजाज कंपनीने दुचाकी बनवली होती. आणि तिचे नाव या जहाजावरुन ‘विक्रांता’ असे ठेवले होते.

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ‘हा’ फेसपॅक लावा ; जाणून घ्या प्रोसेस

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन