मॅगीनंतर पारले बिस्किटातही अळ्या 

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन  – अंबरनाथ मधील पटेल आर मार्ट या दुकानातून घेण्यात आलेल्या  पारले बिस्किटात चक्क अळ्या आढळल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ,  अंबरनाथ मधील  शिवगंगानगर परिसराचे रहिवासी अशोक देसाई यांच्या पत्नीने १६ ऑक्टोबरला तेथील  पटेल आर मार्ट सुपरमार्केटमधून पारले कंपनीचे ‘पारले टॉप’  बिस्किट विकत घेतले. सोमवारी सकाळी त्यांनी हे बिस्कीट खाल्ले, त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. दरम्यान  त्यांनी बिस्किटाचे  पाकीट तपासले,  त्यात त्यांना चक्क अळ्या आढळून आल्या. दरम्यान या संदर्भात देसाई यांनी पटेल आर मार्टमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. मात्र पटेल आर मार्टचे मालक यांनी आपली जबाबदारी झटकत सरळ  कंपनीकडे बोट दाखवले.
इतकेच नव्हे तर दुकान मालकाने  जबाबदारी झटकल्याने देसाईंनी कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला. पण कंपनीमधूनही त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर देसाई यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. देसई  यांनी  शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पारले कंपनी विरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पुण्यात  मॅगी मध्ये अळ्या आढळल्या होत्या आता मात्र पारले बिस्किटातही अळ्या आढळून आल्या यावरून अन्न आणि औषध प्रशासन नेमका करतय तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.