मनसुख हिरेन हत्या प्रकरण : ‘या’ पध्दतीनं रचण्यात आला होता कट, ATS कडून पर्दाफाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   रहस्यमय आणि अतिशय गुंतागुंतीच्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) अधिकाऱ्यांनी सर्वस्वपणाला लावत विविध अंगाने तपास करून छडा लावला आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला होता. मात्र त्यांच्या मृत्यूवरून संशय व्यक्त होत होता. अखेर हा तपास सररकारने ATS कडे सोपवला. बिहारसारख्या गुन्हेगारी राज्यात अट्टल गुन्हेगारांचा खात्मा केलेले धडाकेबाज अधिकारी आणि सध्या महाराष्ट्र एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली एसीपी श्रीपाद काळे आणि डीसीपी राजकुमार शिंदे यांनी मिळून मनसुख यांच्या हत्येचा कट कसा रचला गेला, कटात कोण कोण सहभागी होते, हत्या कशी केली. मृतदेहाची कशी विल्हेवाट लावली अशा विविध पातळीने तपास करत होते.

आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या स्टाईलने हत्येचा तपास सुरु केला. मनसुख यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय या चर्चेला न जुमानता आपल्या सायन्स अभ्यासाचा वापर करत डीसीपी राजकुमार शिंदे यांनी मनसुख यांची हत्या केली आहे, पण ही आत्महत्या आहे, असे चित्र तयार केले गेले. पण ही आत्महत्या नसून हत्या आहे,या दृष्टीने तपास सुरु ठेवला आहे. तपासा दरम्यान हत्येच्या तसेच आरोपींच्या अनेक लिंक मिळाल्या होत्या. मात्र गुन्हा करणारे हे देखील पोलीस असल्याने अतिशय सराईतपणे हा गुन्हा केला होता. त्यामुळे अशा गुन्हेगारांसोबत राहिलेला आणि पोलीस असून गुन्हेगारासारखा विचार करणारा कोणी अधिकारी शिवदीप लांडे यांना पाहिजे होता. मग या प्रकरणात एन्ट्री झाली ती एन्काऊंटर स्पेशलिस्ट वादग्रस्त पण सध्या चर्चेत नसलेले दया नायक यांची. दया नायक सध्या एटीएसच्या जुहू युनिटमध्ये एपीआय म्हणून कार्यरत आहेत.

दया नायक यांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करण्यास नकार दिला होता. पण मनसुख या निर्दोष व्यक्तीची हत्या झाल्याने कुठेतरी दया नायक यांना अस्वस्थ करणारे होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व नेटवर्क ऍक्टिव्ह करत काही तासांतच या कटात कोण सामील होते, कट कसा रचला, यामागचे धागेदोरे शोधून काढत सर्व माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि सुरुवातीपासूनच विविधांगी तपास करून एका विशिष्ट वळणापर्यंत येऊन पोहोचलेल्या तपासाला दया नाईक यांच्या तपासामुळे वेग मिळाला.

तर दुसरीकडे मात्र मनसुख यांच्या हत्येचा तपास हा एनआयएकडे सोपवावा, अशी चर्चा सुरु झाली आणि तपास तिकडे जाणार तोच या सर्व अधिकाऱ्यांनी आपले सर्वस्वपणाला लावले. या सगळ्यांनी जमा केलेले पुरावे आणि तपासाची दिशा ही वरिष्ठांना समजून सांगितली त्यानुसार, 20 मार्चला एटीएसने निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि बुक्की नरेश गोर या दोघाना अटक केली. 11 लोकांनी मिळून मनसुख यांच्या हत्येचा कट कसा रचला याचा उलगडा झाला. पण ज्यावेळेस डीआयजी शिवदीप लांडे. डीसीपी शिंदे, एसीपी काळे आणि एपीआय नाईक या सगळ्या कटाचा उलगडा करताना दुसरीकडे मात्र मनसुख यांच्या हत्या प्रकरणाचा सर्व तपास हा एनआयएकडे सोपवण्यात आला. पण त्यापूर्वीच शिवदीप लांडे यांच्या एका फेसबुक पोस्टने या संपूर्ण हत्येचा उलगडा झाल्याचे स्पष्ट केले.