PM मोदींच्या ‘आत्मनिर्भर’ शब्दाला प्रेरीत होऊन अभिनेत्री कविता कौशिकनं केलं ‘हे’ आसन, चाहते म्हणाले – ‘Spider Woman’ !


पोलिसनामा ऑनलाइन –
अ‍ॅक्ट्रेस आणि सुपर फ्लेक्सिबल कविता कौशिकनं पीएम नेरंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भरच्या घोषणेनं प्रेरीत होऊन एक योग मुद्रा केली आहे. ही योग मुद्रा पाहून चाहतेही इम्प्रेस झाले आहेत. तिचा फोटोही समोर आला आहे जो व्हायरल होत आहे.

कवितानं जी योग मुद्रा केली आहे तो फोटो एका चाहत्यानं ट्विटरवरून शेअर केला आहे. यात ती एक कठिण मुद्रा करताना दिसत आहे. अनेकांनी तिला यावरून प्रश्न केला की, हे नेमकं कोणतं आसन आहे. युजरचं हे ट्विट रिट्विट करत कविता म्हणाली याला आपण आत्मनिर्भर आसन असं म्हणूयात.

पीएम नरेंद्र मोदींनी कालच(मंगळवार दि 12 मे) देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणात त्यांनी आत्मनिर्भर या शब्दाचा वापर केला होता.

कविताचा हा फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी या अवघड आसनासाठी तिचं कौतुक केलं केलं आहे. एकानं तर असंही म्हटलं की हे एखाद्या पेंटींगप्रमाणं वाटत आहे. एकजणानं कमेंट केली की, काश मी तुमचा विद्यार्थी असलो असतो. काहींनी असाही सवाल केला की, ही स्पायडर वुमन कोण आहे.