IB च्या माहितीवरुन PAK ला जाणारे जहाज रोखलं !

कांडला : वृत्त संस्था – चीनहून कराचीच्या कासिम बंदराकडे निघालेल्या एका मालवाहू जहाजाला गुजरातच्या कांडला बंदरावर रोखण्यात आले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) या जहाजाची तपासणी केली जात आहे. तसेच अण्वस्त्र वैज्ञानिकांचे पथकही तपासणीसाठी कांडला येथे जाणार आहे.

या मालवाहू जहाजात ऑटोक्लेव्ह नावाचा एक मोठा भाग आहे. या ऑटोक्लेव्हचा वापर विविध औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रक्रियांसाठी वापर होऊ शकाते. बॅलेस्टिक मिसाइलच्या लॉचिंगसाठी सुद्धा ऑटोक्लेव्ह वापरले जाऊ शकते. डीआरडीओच्या एका पथकाने या आधीच या भागाची पाहणी केली आहे. आता डीआरडीओची मिसाइल शास्त्रज्ञांचे दुसरे पथक आता या जहाजाची तपासणी करणार आहे.

चीनच्या जियांग सू प्रांतातील जियांगयीन बंदरातून हे जहाज कराचीच्या कासिम बंदराकडे जाण्यासाठी निघाले होते. हे जहाज कांडला बंदरात थांबलेले असताना गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर या जहाजाला थांबविण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असलेल्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना आणि गुप्तचर यंत्रणांना या जहाजासंबंधी सर्व माहिती देण्यात आली.

चीन पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला गेल्या ३ दशकांपासून मदत करीत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने ही मोठी डोकेदुखी आहे. पाकिस्तानने चीनबरोबर ३४ एम -११ बॅलेस्टिक मिसाइल खरेदी करण्याचा करार केला आहे. या जहाजावरील ऑटोक्लेव्हचा वापर मिसाइल डागण्यासाठी होऊ शकतो, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातूर भारताने ही कारवाइ केली आहे.

You might also like